कोरोणा संचारबंदीत बाजुच्या जिल्ह्यातील नागरिकांचा वाशीम जिल्हा प्रवेश होऊ नये.
करीता चेकपोष्ट वाढविले गरजेचे — ठाणेदार इंगळे
काजळेश्वर प्रतिनीधी नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
काजळेश्वर उपाध्ये : जील्हा पोलीस अधीक्षकाचे आदेशानुसार कोरोणा संचारबंदीचे कठोर पालन करण्या हेतू तसेच लगतच्या जील्हयातून कोरोणा वाहक आपल्या जील्ह्यात येऊ नये करीता खबरदारीचा उपाय म्हणून कारंजा ग्रामीण पोलिसांचे चेकपोष्ट वाढविले असल्याचे काजळेश्वर येथील चेकपोष्टला भेट देतांना कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिगंबर इंगळे यांनी दि .१ मे रोजी स्पष्ट केले .
प्राप्त माहीतीनुसार शेजारील अकोला जिल्हयात कोरोणा संक्रमीत रुग्ण वाढत आहे वाशिम जिल्हा कोरोणा मुक्त आहे . अकोला जिल्ह्यातील पींजरघोटा मार्गे किवा धानोरा पाटेकर मार्गे अथवा खांदला मार्गे छूपे आवागमन थांबावे ;कोरोणा बाधीत वाहकाचा संसर्ग कारंजा तालूक्याकरीता काजळेश्वरमार्गे होऊ नये करीता पोलिस प्रशासना तर्फे खबरदारीचा उपाय म्हणून चेकपोष्ट वाढविण्यात आले आहे . त्यानुसार सर्वत्र १४४कलम नुसार जमाव बंदीच्या आदेशाने संचारबंदी लागु केली आहे तेव्हा आपले गाव ;आपला तालूका आपला जिला कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी सर्वानी स्वयंशिस्त पाळून शासन प्रशासनाचे आदेश पाळावेत असे आवाहन चेकपोष्ट भेटीदरम्यान कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिगंबर इंगळे यांनी केले .