पंचशील स्कुलमधे संभाजी महाराज जयंती साजरी
मंगरूळपीर प्रतिनीधी अशोक राऊत { कारंजा हुंकार }
:- स्थानीक पंचशील इंग्लीश स्कुलमधे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थासचीव राहुलदेव मनवर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केला.
आज कोरोना व लाॅकडाऊनमूळे देशभरातील नागरिकांमधे भितीचे वातावरण आहे. त्यामुळे अशा परिस्थीतीला सामोरे जाताना महापुरूष व चारित्र्यसंपन्न राजांचे विचाराशीवाय या देशाला कुणीही तारू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपले आजोबा शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य ऊभारणीत मौलीक कार्य केले. बालपणी लिहिलेल्या बुधभुषण ग्रंथासह ४ ग्रंथ लिहीले. त्यांनी आपल्या राज्यातील जनतेची विशेषतः शेतकऱ्यांची काळजी घेतली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या ३३ वर्षाच्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाही. त्यांच्या आयुष्यातील दुर्दैवी घटनेची अर्थात स्व राज्यातील फितुराने अल्पश: फायद्यासाठी त्यांना शत्रुच्या हाती पकडून दिले व शत्रुने त्यांचा क्रुरपणे अंत केला. अशा फितुरांनाही आज वेळीच जरब बसवीली पाहीजे, असा सुद्धा एक सुप्त संदेश आहे. त्यामुळे अशा राजाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याकरीता व तसे राज्यकर्ते घडण्याकरीता छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली असल्याचे मनवर यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्याध्यापीका करुणा मनवर, इंजिनीअर आशुतोष भगत, प्रदीप कांबळे, तन्मय मनवर आदींनी छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.