कि.न.गो. महाविद्यालयाकडून सीएम रिलीफ फंडात ६५ हजाराची मदत
प्रतिनिधी । कारंजा लाड { कारंजा हुंकार } दि.१६ मे
दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी,अकोला द्वारा संचालित किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय कोडापे तसेच वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ या खात्यामध्ये ६५ हजार ६१ रुपये धनादेशाच्या स्वरूपात तहसीलदार धीरज मांजरे यांना दिले आहे.
कोरोना या जागतीक महामारीचा सामना संपूर्ण देशांसह महाराष्ट्र करत असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाच्या वतीने ही मदत करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या रुपाने देशावर मोठे संकट कोसळले आहे. या संकटाचा सामना शासन व प्रशासनातील सर्व घटक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत.अशा कठीण प्रसंगी देशाला आर्थीक मदतीची गरज असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा राज्यातील नागरीकांना सीएम रिलीफ फंडात आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून, समाजातील सर्व घटक आपआपल्या परीने आर्थिक मदत देत आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक बांधव आपआपल्या परीने आर्थिक, अन्नदान व इतर स्वरुपात मदत देण्यासाठी पुढे येत असून, संकटकाळी देश वाचविण्यासाठी मदतीसाठी पुढे येत आहेत.या मदतीचे धनादेश देतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय कोडापे,प्रा.जमील शेकूवाले, प्रा.सुरज टीलावत यांची उपस्थिती होती. तसेच मदत करणाऱ्या सर्व प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी पत्र देऊन आभार मानले.