ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदण रस्ते शिवार वही वाटा होत आहेत नामशेष
लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्याची गरज
वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक रस्ते बंद सर्वाधिक तक्रारी रस्त्याच्या
बोरगाव पांदनरस्ता
कारंजा लाड — मालेगांव प्रतीनीधी दत्तात्रय शिंदे दि. १७ मे
सध्या कोरोना या महाभयंकर बिमारीचे सावट आणि नंतर मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना शेती रस्त्याचे सावट आता जून महिना लागत आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतीची तितकीच काळजी असते सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्याधुनिक यंत्रणेला सर्वाधिक पसंती शेतकऱ्याची असते सरर्वच कामे ट्रॅक्टरच्या साह्याने करावी लागत आहेत पूर्वीच्या काळामध्ये चाळीस फुटाच्या
जवळपास रस्ते असायचे पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही कारण अक्ख शेत गेले तरी चालेल पण धुरा जाऊ द्यायचं नाही अशी वृत्ती अनेक शेतकरी वर्गामध्ये असल्यामुळे आहे ते रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात गेले आहे काही तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पांगरी नवघरे भागातील जसेकी बोरगाव पांदण रस्ता या रस्त्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाले आहे व या संबंधित शेतकरी वर्गाने तक्रार दाखल केली आहे गावचे तलाठी मंडळाधिकारी पोलीस पाटील सरपंच यांनी पाहणी केली असून अहवाल तहसील कार्यालयामध्ये जमा केला आहे पण अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही अजून जे शेतातील पाण्याचा स्त्रोत आहे मुख्य द्वार बंद झाल्यामुळे त्यामधील शेताचे व गावानजीक घाणीचे पाणी एकत्र होत असल्यामुळे असलेले पाणी हे गाव मध्ये शिरत आहे सध्या काही दिवसांनी पावसाळ्याला सुरुवात होतं जर या पाण्याचा प्रवाह गावात शिरतच राहिला तर कुठल्याही बिमारी ला आमंत्रण देण्याला वेळ लागणार नाही
सर्वच पांदन रस्त्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यामुळे सर्व शेतीचे अवजारे घेऊन सर्व वाहने गावांमधून प्रवेश करत असतात अशातच लहान मुले रस्त्यावर खेळत असताना कुठलाही अनर्थ होऊ शकतो पण ह्या गोष्टी जबाबदार व्यक्तीचा लक्षात कधी येतील का प्रशासनाला कधी कळेल का पांगरी नवघरे शिवारामध्ये सर्व पांदण रस्ते व वहीवाटा अतिक्रमणाच्या विळख्यात असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पांगरी नवघरे
परिसरामध्ये कोली प्रकल्प तूडूबभरला ही जाण्याची फार कठीण होत आहे ज्या वहिवाट आहेत त्या प्रशासनाच्या निद्र अवस्थेमुळे अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत आज घडीला कोरोणासारख्या महाभयंकर बिमारी ने सर्वत्र हाहाकार माजविला आहे सर्व कामे ठप्प झाली आहे आणि अशातच शेवटी सर्वच गोष्टी शेतीवर अवलंबून आले आहेत
भारत हा कृषिप्रधान देश आहे भारताचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९०५ या कायद्याअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला आपल्या शेतापर्यंत जाण्याचा अधिकार आहे त्याला रस्त्या हा असतोच जर अशा रस्त्यावर अतिक्रमण केले असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार समोर तक्रार दाखल करून आठदिवसाच्या आतहा रस्ता मोकळा करूशकतो त्यामध्ये न्याय मिळण्याची मामलेदार कोर्ट पाच कलम अर्ज नमूद केला आहे
अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पत्त्यासह लिहून त्यामध्ये मजकूर होणारे घटकांसह शेती रस्त्याचे अतिक्रमण हे जमीन बिन शेती असल्यास जमिनित पर्यंतचा रस्ता नकाशा मध्ये दर्शविला असतो परंतु आज घडीला तसे काहीच राहिले नाही कारण कायदा-सुव्यवस्थेचा कुणाला भेवच राहिले नाही पूर्विच्या प्रशासनात कामकाजात आणि आत्ताच्या कामकाजात जमीन-अस्मानचा फरक आहे शेतकऱ्यांना खूप कुठल्या अधिकार्यावर विश्वास नाही नेमका गोष्टीचा न्यायनिवाडा होईल का नाही मोठ्या शरमेची बाब आहे आपल्यापेक्षा इंग्रज बरे होते त्यांच्या काळामध्ये सर्व जमिनीचे मोजमाप झाले होते सर्व नकाशे तयार झाले होते परत शेतकर्यांच्या वतीने सरकारला अशी विनंती करतआहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विधिमंडळामध्ये आज रोजी ९० टक्के आमदार खासदार अनेक स्तरातले लोकप्रतिनिधी शेती शेतकरी वर्गातून आहेत त्यांना कसे कळत नाही सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व एकत्र येतात पण मायबाप कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी का नाही अनेक शेतकरी संघटना आहेत आपण पाहतो सर्वाधिक तक्रारी फौजदारी गुन्हे हे शेतीवर अवलंबून आहेत कोणाच्या शेतात रस्ता नाही कुणाचा माल आहे तो आणायचा आहे त्याला अडचण अनेक पण त्याचे रूपांतर हाणामारी होऊन अनेकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले ह्या गोष्टी कधीच शासनाच्या लक्षात येतील का पूर्ण जमिनीचे पूर्ण मोजमाप करून पूर्ण डिजिटल डिजिटलायझेशन नकाशे तयार करून ज्या शेतीच्या वहिवाट आहेत पांदण रस्ते आहेत हे कधी मोकळा श्वास घेतील का असाही प्रश्न निर्माण होतो आपल्या प्रशासनाला कधी लक्षात येईल का सर्व
केंद्रीय राज्यस्तरीय यांना लक्ष देण्याची फार गरज आहे शेतीचा वाद भाऊ भावाला ओळखत नाही शासनाच्या जमीन प्रमाणामध्ये आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे शासनाला सुद्धा ठाऊक नाही तरी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने प्रशासनांना एकदा ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची फार गरज आहे