कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मोजक्या
लोकांच्या उपस्थितित आदर्श विवाह संपन्न
मंगरुळनाथ प्रतिनीधी — अशोक राऊत { कारंजा हुंकार } दि.१७ मे
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शासनाचे अविरत प्रयत्न सुरु असतांना आणीबाणीच्या काळात वधू व वर पक्षांना खर्च लागणार नाही तसेच पैश्याची उधळपट्टी न करता पैश्याची बचत होईल असाच आदर्श लग्न सोहळा शहरातील संभाजी नगर येथे अत्यल्प नातेवाईकांच्या उपस्थितित दि.१२मे रोजी संपन्न झाला.
जुळून येतील रेशीम गाठी म्हणत दोन जीवांना रेशीम गाठीत बंधने म्हणजेच शुभ विवाह. लग्नाच्या तारखा काढणे,लग्नाच्या तयारी करणे असे सर्व कार्यांना जोरात सुरुवात केली जाते . मात्र २०२० वर्षे सुरवात अगदी चांगली झाली आणि मार्च महिन्यातच कोरोना नावाच्या महाम रीचे ग्रहण संपूर्ण जगाला लागले यातच सर्वांना हादरवून सोडले आहे . कोरोना चे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे.यातच काही जुळलेले विवाह काहींनी समोर ढकलले तर काहींनी ठरलेल्या तारखेतच विवाह करण्याचा निर्णय घेतला.
शहरातील संभाजीनगरात राहणारे पत्रकार सुनिल नामदेवराव भगत यांची कन्या पुजा व भोपाळ (मध्यप्रदेश) येथील संतोष राजाराम सोनोने यांचे चिरंजीव अनिल यांचा विवाह जानेवारी महीन्यातजुळुन आला.याच महीन्यात साक्षगंध झाले.पुजा व अनिल उच्च विद्याविभुषित व चांगल्या नौकरीवर असल्याने या दोघांचा विवाह सोहळा थाटामाटात करण्याचे दोन्हीही कुटुंबाने ठरविले.
परंतु देशात कोरोना या विषाणुने मागील
दिड महीन्यापासुन थैमान घातल्यामुळे
संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने गर्दी होवु न
देणे हाच एक उपाय असल्याने शासनाने
२२मार्च च्या जनता कर्फ्यु नंतर लाॅकडाउन
व संचार बंदी सुरु केल्याने उपवधु-वर दोन्ही
पक्षाकडील लोकांच्या मनातील थाटामाटाने
लग्न सोहळा साजरा करण्याच्या इच्छा पुर्ण
होवु शकणार नाही याची जाणीव भगत व सोनोने परिवारास झाली.नीट विचार
करुन आयोजित लग्न साध्या पद्धतीने
उरकण्या निर्णय तडकाफडकी घेण्यात
आला.१२मे २०२० रोजी लग्न उरकण्याची
योजना आखली.
दोन्हीही परिवारांनी कोणताही रुसवा फुगवा
न ठेवता हा आयोजीत विवाह सोहळा दहा ते
ते बारा पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडला.
कोणताही गाजावाजा न करता,कोणतीही गर्दी न होवु देता पार पडलेल्या विवाहोत्सवाचा विधी सोहळा वसंत इंगोले यांचे हस्ते झाला.
या मंगल प्रसंगी भगवान गौतम बुद्ध व डाॅ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वर्णलेपी पुतळ्याला नववधु "पुजा" आणि "वर"
अनिल यांनी वंदना करुन एकमेकाच्या गळ्यात पुष्पमाला टाकुन विवाहाच्या रेशिम बंधनात बांधुन घेतले.नवरीची आई छाया,मामा राजु मनवर अशोक मनवर चेहेल,मोठे बाबा बंडु भगत,भाऊ राहुल भगत व नवरदेवाचे वडील संतोष सोनोने व आई निर्मला सोनोने यांनी उभयतांना आशिर्वाद दिलेत.
उपस्थितांनी फुलांचा वर्षाव केला टाळ्या
वाजविल्या.नातेवाईकांनी व्हाट्सप फेसबुक
वरुन मंगल कामना व्यक्त केल्या व शुभेच्छांच्या
पोस्ट टाकल्या भावी जीवनाचे आशिर्वादही
दिधले.या प्रसंगी उपस्थित पाहुण्यासाठी
हात धुण्याकरिता हॅंडवाश,सॅनिटायझर
ची व्यवस्था करण्यात आली.परिसरात
साफ सफाई,सेनिटायझींग करण्यात आले.
सोशल डिस्टंचे पालन करण्यात आले.
या प्रसंगी प्रा.नंदलाल पवार,अविनाश पाकधने
नाना देवळे,रमेश मुंजे,सुधाकर क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
कमीत कमी खर्चाचा आदर्श विवाह साध्या
पद्धतीने पार पडला.या वरुन दोन्ही उपवधु-वर
पक्षाचा विचाराचा आदर्श घेण्याची गरज आहे.