खानापुर येथे बाहेरगावावरुन आलेल्याची गैरसोय .
ग्रामपंचायतचे दुर्लक्ष .सचिवाचे दोन महिण्यापासुन दर्शन नाही.ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी
कारंजा लाड { कारंजा हुंकार }
कारंजा तालुक्यातील ग्राम खानापुर येथील नागरिक हे गावात आले आहे आणी त्यांना ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेत १५ दिवसासाठी मुक्कामाला ठेवले आहे परंतु ज्या शाळेत ठेवले त्या शाळेत कुठलीही सुविधा नसल्याने आजारी पडण्याची भिती निमान झाली आहे
सविस्तर वत असे कि दि.६ मे रोजी सकाळी दोन कुंटुब सुरत वरुन खानापुर येथे आले सर्व प्रथम त्यांना डाॅक्टर यांनी वैद्यकीय तपासनी करुन १५ दिवस घरी न जाता जिल्हा परिषद शाळेत मुक्कामाला ठेवण्यात आले .आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्या कुंटुबियासोबत तीन लाहान मुले आहे त्यामुळे उन्हाळा खुप तापत असल्याने सदरु शाळेवर टिन पञे आसल्याने खुप तापतात त्यामुळे तेथे पंखा सुध्दा लावला नाही पिण्याच्या पाण्याची सुध्दा सोय केली नाही याबाबत ग्रामसेवकास सदर माहिती सांगीतली असता उडवा उडवीची उतरे देतात व माझी बदली करा असे म्हणतात गेल्या दोन महिन्यापासुन ग्रामसेवक हे गावात फिरकुनही पाहत नाही कोरोनासारख्या आजाराणे डोके वर काढले असतानाही गावात येत नाही तरी गटविकास अधिकारी यांनी लक्ष देवुन सदरु ग्रामसेवकास समज द्यावी अशी मागणी जोर धरत आहे
खानापुर येथे बाहेरगावावरुन आलेल्याची गैरसोय . ग्रामपंचायतचे दुर्लक्ष .सचिवाचे दोन महिण्यापासुन दर्शन नाही.ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी
• ankush kadu