शंभूराजे जन्मोत्सव
1657 सालातील 14 मे चा दिवस उजाडला होता... स्वराज्यातील सुवर्णदिवसातील आणखी एका दिवसाचा सूर्योदय झाला आणि किल्ले पुरंदरचा आसमंत शंभूबाळांच्या रडण्याने दणाणला... स्वराज्यात सर्वत्र वातावरण अगदी उल्हासित झाले सणाचेच स्वरूप आले होते स्वराज्यातील प्रत्येक घराला... जिजाऊंना पण खुपच आनंद झाला थोरल्या आऊसाहेब झाल्याचा आनंद होता तो... आणि ही शुभवार्ता शिवरायांना लवकर कळावी म्हणून त्यांनी लगेच सांगावा धाडला विश्वास नावाच्या हेरासोबत.... त्यावेळी शिवाजीराजे मोहिमेवर होते..आणि शिवरायांना आपल्या धन्याला ही वार्ता लवकर कळावी म्हणून नेहमीपेक्षा दुप्पट वेगाने विश्वास घोड्यावरून दौडत होता... त्याची गाठ रस्त्यात बहिर्जींसोबत पडली.. बहिर्जी म्हणाले काय रं इस्वास काय निरोप आणलास एवढ्या लगबगीने... विश्वासने बहिर्जींना मुजरा केला आणि म्हणाला नाईक बाळकृष्ण जन्मास आले.... आनंदाची वार्ता आहे.... स्वराज्याचे धाकले धनी आले म्हणून थोरल्या आऊसाहेबांनी राज्यास्नी सांगावा धाडला... लय बेस खबर दिली गड्या चल राजास्नी तातडीने खबर देऊ... आणि पुढील रस्ता निर्धोक आहे की नाही म्हणून बघायला आलेले बहिर्जी विश्वाससह तातडीने माघारी फिरले... काही अंतर घोडदौड केल्यावर राज्यांची भेट घडून आली... राजे म्हणाले काय बहिर्जी रस्ता निर्धोक आहे ना ! आणि निर्धोक असेल तर का फिरलात तुम्ही माघारी?
बहिर्जी म्हणाले राज रस्ता निर्धोक आहेच पर खबर लय बेस हाय राज.. स्वराज्याचे धाकले धनी आलेत......किल्ले पुरंदरी बाळकृष्णाचा जन्म झाला... राजे म्हणाले व्वा खुप आनंदाची खबर दिलीत आणि राज्यांनी आनंदाने आपल्या हातातील कडे विश्वासच्या हातात ठेवले...लागोलाग राजे तातडीने गडावर पोहचले आणि गडावर आल्यावर प्रजेला साखर वाटप झाला...स्वराज्यात सर्वत्र आनंद ओसंडून वाहत होता आणि का नाही वाहणार? कारणही तसेच होते..छत्रपतीपुत्र जन्मास आले म्हणजे किती मोठा हर्ष... !
सर्वत्र आनंद होता मात्र एक दुःखाची वार्ता पण होतीच राणीसाहेब सईबाई यांनी कायमचे अंथरून धरले होते.. चार पावले चालने सुद्धा त्रासाचे ठरत होते त्यांना... लगेच पायाला गोळे येत होते, अंथरुणावरून उठणे सुद्धा अवघड जाऊ लागले.. चार घास पोटात जात नव्हते शरीराला नुसती मरगळ आल्यागत झाले होते... आणि परिणामी शंभूबाळ आईच्या दुधाला पोरकं झालं होतं. सईबाई शंभूबाळाला उचलून जवळ सुद्धा घेऊ शकत नव्हत्या. त्यांचं अंतःकरण खुप जळत होत कारण शंभूबाळाला आईच प्रेम, वात्सल्य मिळत नव्हतं... शंभूबाळ भुकेने व्याकुळ होत होते.. त्याच आणखी जास्तच दुःख सईबाईंना होतं आणि हे जिजाऊंना बघवत नव्हतं म्हणून त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडच्या कुणबिणीचा शोध घेतला.. तीच नाव होतं धाराऊ.
धाराऊच बाळ जन्मताच मृत झालं होतं तेव्हा जिजाऊंनी धाराउला शिवपुत्रास दूध पाजण्यास विचारले आणि त्या माउलीने ही ईश्वरी सेवा म्हणून लागलीच होकार दिला धाराऊ म्हणाल्या आम्हाला देवाच्या लेकरास दूध पाजायची नामी संधी चालून आलिया हे तर माझे पूर्वजन्मीची पुण्याईच... शंभूबाळ धाराऊंच्या दुधावर आणि जिजाऊंच्या तालमीत वाढू लागलं... शंभूबाळ गडावर सर्वत्र दुडूदुडू धावायला लागलं.. ते कौतुक बघायला सईबाई अंथरुणातून उठू पण शकत नव्हत्या आणि अंथरुणात पडून रडण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हत्या त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच होता त्यात कोणतीही सुधारणा होतं नव्हती सगळे चिंतेत होते आणि शिवपुत्र शंभूबाळ अवघ्या सव्वादोन वर्षाचे असताना सईबाईंनी या जगाचा निरोप घेतला... शंभूबाळ आईच्या प्रेमाला पोरक झालं ते कायमचच...
जन्मापासून शंभूराजे जणू संकटे घेऊनच जन्माला आले होते... पुढे वयाच्या नवव्या वर्षी प्रत्यक्ष दैत्य असलेल्या औरंग्याच्या मगरमिठीत शिवरायांसह अडकले मात्र त्यातून सुखरूप सुटका, ओलीस म्हणून दिलेरखान व मिर्झाराजे यांचे छावणीत वास.. महाराजांच्या सततच्या मोहिमांमुळे वडिलांच्या प्रेमास वंचित... महाराजांचे अकाली निधन, मंत्र्यांचे कुटील कारस्थाने, शंभुराजेंना डावलून दहा वर्ष्याच्या राजारामांचा राज्याभिषेक, शंभूराजेंच्या अटकेचा डाव,तीन वेळा विषप्रयोग, पाच पाच बलाढ्य शक्तींशी एकाचवेळी यशस्वी लढा, सतत लढ़ाया आणि मोहिमा,एकशे वीस पेक्षा जास्त लढ़ाया लढून सुद्धा आयुष्यात एकही लढाई न हरलेला जगातील एकमेव राजा.. आणि शेवटी दगाफटक्याने पकडले जाऊन चाळीस दिवस अत्यंत हाल करून औरंग्याकडून हत्या.....
एकंदरीत शंभूराज्यांचे आयुष्य केवळ संकटांनी वेढले गेले होते हे आपल्या लक्षात येते.. मात्र संकटे एखाद्या व्यक्तीचा पाठपुरावा त्याच्या मरणापर्यंत करत असते परंतु शंभूराजांचा पाठपुरावा अजूनही चालूच आहे.. अजूनही लोक त्यांच्या चारित्र्याच्या ठिकर्या उडवण्यात धन्यता मानतात.. त्यांना दारुड्या, रंडीबाज म्हणून त्यांची समाजात बदनामी करण्यात आली. मात्र सत्य ते सत्य असत... आणि जगाला खरे शंभूराजे काही जिज्ञासू इतिहासकारांमुळे समजायला लागले... मात्र जगाला खरे शंभूराजे कळायला चारशे पेक्षा जास्त वर्ष लागतात ही एक शोकांतिका म्हणावी की षडयंत्र हा एक प्रश्नच...असो.......
मात्र एवढं सगळं वाट्याला येऊन सुद्धा शंभूराजे खचले मुळीच नाही.. उलट त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी सप्तहजारी मनसबदारी मिळवली, वयाच्या चवदाव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिला, सतरा भाषा आत्मसात केल्या, जातीधर्म भेद नाकारला, चार ग्रंथांचे लेखन केले, उत्कृष्ट राजकुमार राजाच नव्हे तर उत्कृष्ट कवि म्हणून पण नावलौकिक मिळवले. आयुष्यात एकशे वीस लढ़ाया जिंकून एकही लढाई न हरणारे राजे ठरले आणि त्याची दखल ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली.
अशा राजांचा इतिहास नक्कीच प्रेरणादायी ठरतो. शंभूराज्यांचे चरित्र हेच शिकवते की संकटे राजपुत्राला,राजाला सुद्धा असतात मात्र त्याला घाबरून,खचून न जाता त्यावर मात करता येते ते आपल्या प्रयत्नातून आणि इतिहासात आपले नाव आपल्या कर्तबगारीने सुवर्ण अक्षरात लिहिता येते ते केवळ आपल्या कर्तबगारीतुन...
मात्र महाराष्ट्राची, देशाची शोकांतिका ही आहे की आम्हाला बाबर, खिलजी, अकबर, हुमाँयू,शाहजहाँ शिकवले जातात मात्र शिवरायांचा, शंभूराज्यांचा, इतिहास पाठ्यपुस्तकातून वगळला जातो...
आज आपण एक कार्य तर करूच शकतो की जरी पाठ्यपुस्तकातून शिवराय, शंभूराजे वगळले जात असतील पण आमच्या मनातून त्यांना वगळले जाणे शक्य नाही हे दाखवून देऊ शकतो.. आम्ही शिवराय, शंभूराजे आमच्या काळजात कोरून ठेवणे आवश्यक आहे आणि त्यांचा इतिहास घरात आपल्या मुलांना सांगायचा आहे परिणामी मुलांना शिवराय आणि शंभूराज्यांच्या इतिहासात साक्षर करने आमचे प्रथम कर्तव्य समजून त्यांना खरे शिवराय,शंभूराजेंची ओळख करून देणे प्रथम कार्य समजावे.. आणि जर आपण हे करू शकलो तरच समजूया की आपण आजची शंभूराज्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी करतोय...
जय शहाजी जय जिजाऊ !
जय शिवाजी जय संभाजी !!
हर हर महादेव
विनीत
पुंडलिक लसनकुटे
मु.वढवी ता.कारंजा जि. वाशिम
7798636169