संपूर्ण जगामध्ये कोरना या रोगाने कहर केला आहे दिवसेंदिवस आपण बघतो अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आपल्याही देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे अशा परिस्थितीत देश धोक्यात असताना कोणी घराच्या बाहेर निघू नये अत्यंत महत्त्वाचे काम असले तरच घराच्या बाहेर निघावं कारण आज परिस्थिती अत्यंत भयावह आहे आपल्या देशातील आकडा झपाट्याने वाढत आहे त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या स्तरावर काही ना काही मदत करत आहे तर समाज प्रबोधनकार मंडळी आपल्याला घरातूनच सोशल मीडियाद्वारे जनतेला संदेश देण्याचे काम ही करत आहेत या समाजप्रबोधन कारांनी महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या समाजप्रबोधनात गाडगेबाबा तुकडोजी बाबा शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पोहचवण्याचे काम केले . ज्यांच्यासमोर रोज कीर्तनाला हजारोंची गर्दी असते असे प्रबोधनकार आज तुम्हाला आपल्या घरात चार भिंतीच्या आत राहून प्रबोधन करत आहेत सत्यपाल महाराजांची सर्व शिष्य मंडळी आपापल्या घरातून जनतेला एक महत्वाचा संदेश देण्याचं काम करत आहेत त्यामध्ये गुरुवर्य सत्यपाल महाराज संदीपपाल महाराज कमल पाल महाराज गाठे
डॉ रामपाल महाराज पंकजपाल महाराज पवन महाराज दवंडे तुषार महाराज सूर्यवंशी आकाश दादा टाले चेतन बेले आणि बरेच समाजप्रबोधनकार यांनी आपल्या घरातून सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत वारंवार प्रबोधनाचा काम केला आहे आणि अजूनही करत आहेत त्यामुळे जनतेला कळकळीची विनंती की आपण घरातच राहायचं आहे आणि आपल्या देशाचा संरक्षण आपल्याला करायचा आहे कारण या मार्गातून आपल्याला वाचायचं असेल आणि जगाच्या तुलनेत आपल्या देशात सध्या परिस्थिती जास्त हालाखीची नाही पण ती परिस्थिती गंभीर होऊ नये कारण त्याचं नुकसान आपल्याला भोगावे लागणार आहे कारण देश आपला आहे म्हणून या कोणाच्या लढाईत आपल्या परीने जे जे होते ते सहकार्य करावं आणि आपल्या घरांमध्ये राहावं काळजी घ्यावी आणि ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या सूचना आपल्याला केल्या गेल्या की वारंवार हात धुवावे स्वच्छता राखावी कपडे दर दोन-तीन दिवसांनी गरम पाण्याने धुवावे भाजीपाला आपण आपल्या घरी आणला असेल ते व्यवस्थित धुऊन घ्यावे मुलाबाळांना घरातच ठेवावं आणि आपणही जास्त घराच्या बाहेर राहू नये अति महत्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर निघावे.
<no title>