मंगरुळपीर शहरात शिरकाव करन्या पुर्विच आपली तपासनी करा
मुख्याधिकारी मिलींद दारोकार
मंगरुळपीर तालुका प्रतीनिधी अशोक राऊत कारंजा हुंकार
मंगरुळपीर या शहरात परराज्यातून अथवा आपल्याच राज्यातील इतर जिल्ह्यातून आपल्या इच्छित स्थळी प्रवास करणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती आहे. आतापर्यंत आपण आहे त्या ठिकाणी सुरक्षित होते. परंतु आता आपण आपल्या इच्छित ठिकाणी जात असताना एक काळजी घ्या. राज्यातील अनेक गाव तालुके असे आहे की त्या ठिकाणी अद्याप कोरोनाचा शिरकाव झाला नाही.सरकारी यंत्रणा आणि त्या त्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांच्या सावधगिरी मुळे तो तो भाग सुरक्षित आहे.त्या भागात आता आपण जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जात असताना सरकार ने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा.तुम्हाला काही लक्ष असेल तर सजग नागरिक म्हणून रुग्णालयात दाखवून द्या. त्यामुळे आपण ज्या मार्गाने आपल्या गावात जाणार आहे. त्या ठिकाणी आजपर्यंत सावध होऊन कोरोनाला ठरवणाऱ्या व्यक्तींना आपल्या बेभानतेमुळे कदाचित कोरोनाच्या बाधा होऊ नये यासाठी आपण स्वतःची आधी तपासणी करून घ्या....गावी गेल्यावर किमान 15 दिवस घरातच स्वतःला बंदिस्त करून घ्या.त्यामुळे आपल्या भागातील दिवसरात्र एक करून सुरक्षित ठेवलेल्या सरकारी यंत्रणेच्या मेहनतीला आणि आपाल्या गावातील भागातील लोकांच्या सवाढतेला धक्का लागणार नाही याची देशाचा नागरिक म्हणून किमान सावधानता बाळगा.यामुळे किमान आपल्यामुळे कोरोनाला माझ्या भागात अथवा माझ्या गावात अथवा माझ्या घरात शिरू देणार नाही याची शपथ घ्या. तुमचे होणारी अडचण पाहता सरकारने तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी पोहचवण्यासाठी अतोनात अहोरात्र प्रयत्न सुरू केले आहे. त्यांनी त्यांचे घर दुर्लक्षित करून जनतेच्या सुरक्षिततेसाठी मेहनत घेत आहे. आरोग्य यंत्रणा कोरोना बांधितांना दुरुस्त करण्यासाठी स्वतः संकटात झोकून देत काम करत आहे. अनेक लोक घराच्या आहे त्या आर्थिक अडचणी सहन करीत कोटोनशी झुंज देत आहे. त्यात हातावर पोट असणाऱ्यांची जास्त संख्या आहे. त्यामूळे गेल्या दीड महिन्यापासून सावधतेचे व्रत स्वीकारलेल्या आपल्या बंधु आणि भगिनींच्या व्रतात खंड न पडू देण्याचा आपण संकल्प करा. आणि गरज असेल तरच आहे त्या ठिकानाहुन आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करा. तो ही आपली सुरक्षितता बघून असे आवाहन मुख्याधिकारी मिलिंद दारोकार व नगर परीषद कडुन करन्यात येत आहे .
मंगरुळपीर तालुका प्रतीनिधी
अशोक राऊत