डॉ. कांत यांची रुग्ण सेवा अविस्मरणीय :- राजीव भेंडे कारंजा
कारंजा लाड { कारंजा हुंकार } दि .८ मे.
कारंजा येथील डॉ. अजय कांत यांनी कशाचीही भीती न बाळगता सर्व रुग्णास दिवस रात्र सेवा दिली .त्यांचे रुग्णालय व त्यांचे रुग्णालयातील सर्व त्यांचे सहकारी यांनी सर्व रुग्णास अतिशय चांगली सेवा दिली.ही त्यांची सेवा अविरत सुरू असतांना आज त्यांचेवर कॉरेंटाईन होण्याची वेळ आली असतांनाही अत्यंत धीरोदात्यपणे ते सर्वाना आजही दिलासा देत आहे. डॉक्टर साहेब आपण काळजी घ्या पण काळजी करू नका आम्हास विश्वास आहे की, आपले रिपोर्ट सर्व निगेटिव्ह येतील कारण रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजुन आपण रुग्णांना सेवा देत असता तेव्हा सर्वांचे आशीर्वाद आपल्या सोबत असुन आपण या आशीर्वादाचे बळावर यावर मात करून पुन्हा सेवारत होणार असा आपणास विश्वास आहे.आपल्या पाठीशी असणारी कारंजा येथील जनतेचे आशीर्वाद व आपले गुरुमहाराज आपणास काहीही होऊ देणार नाही.आपली ईश्वराकडे मागणी आहे; त्याकडे प्रार्थना आहे की, आपणास व आपल्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांची यातुन त्वरीत मुक्तता करून सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह येऊ दे.