कामरगाव येथे अवैध दारू वाहतूक करणायावर पोलीसांची कार्यवाही, दारूचे ९ कवाटरसह वीस हजार चा एैवज जपत
कामरगाव प्रतिनीधी धनराज उटवाल { कारंजा हुंकार }
दि. ६तारखे पासुन दारू विक्री ची परवानगी देण्यात आली दारूडया मध्ये आनंद संचारला अशातच काही दारू डे व दुकान चालक या संधीचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले असून केवळ ७५० मिली दारू (एक युनिट) चा एक दिवस ीय परवाना देवुन देशी दारू दुकानदार परतेक ग्राहकांना ९ते १० कवाटर दारू विकत असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा प्रकार कामरगाव येथे वादग्रस्त दारू दुकानात घडला. आज दि. ७ रोजी ११वा.चे दरम्यान पोलीस गस्ती वर असतांना टाकळी येथील देवानंद हारु यास विनापरवाना देशी दारू चे ९ कवाटर वाहुन नेत असताना रंगे हात पकडले व एक मोटरसायकल सह विस हजार पाचशे चाळीस रुपयांचा माल जप्त करून मुंबई दारू बंदी कायदा ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गाहकाचा दारू बाळगण्याचा एक दिवसीय परवाना व दारू विक्री यात तफावत आढळल्याने संबंधित प्रकरणी दारू दुकानचालकास याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क केला असता अधीक्षक यानी आमच्या विभागाने गुलाबी रंगाचे असलेले एक दिवसीय परवाने कोणत्याही दुकानांना दिले नसल्याचे सांगितले. व गारहकांची नावे नोंद करण्याचे तोंडी आदेश असल्याचे सांगितले. परंतु दारू दुकान चालक कोणत्याही प्रकारची नोंद करत नसल्याचे आढळून आले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व देशी दारू दुकानदार यामध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट होते. सदर जप्तीची कारवाई पोलीस उपनिरीक्षक कपिल मसके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक श्यामल ठाकुर, जमादार सोनोने, सुनील टाले करित आहे.