गर्दी टाळण्यासाठी चक्रानुक्रमे उघडावीत प्रकारनिहाय दुकाने
ग्रीन झोनमधील सुखद शिथिलतेत मौज करणाऱ्यांना चाप लावणे आवश्यक
सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी.
मंगरुळपीर प्रतिनीधी — अशोक राऊत { कारंजा हुंकार }
अढळत असलेले रुग्ण व संशयित पाहता ग्रीन झोनमधील होत असलेली बेसुमार गर्दी टाळायची असल्यास ठराविक प्रकारच्या दुकानांना विशिष्ट दिवशी उघडण्याची परवानगी दिल्यास गर्दीस आळा घातला जाईल त्यामुळे प्रशासनाने तसे नियोजन करावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी एका प्रसिध्दीपञकाव्दारे प्रशासनाकडे केली आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
त्यातच गेले कित्येक दिवसांपासून लॉक डाऊनचा सामना करीत असलेली जनता ग्रीनझोनच्या सुखद शिथिलतेचा मनसोक्त लाभ घेत आहे.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी येत आहेत यातील सर्वच लोकांना अत्यावश्यक कामे नसून काहीजण ज्यांना काम आहे त्या लोकांसोबत सोबत सोबती म्हणून फिरायच्या निमित्ताने बाहेर पडताहेत. मोटर सायकलवर केवळ एक व्यक्ती अपेक्षित असतांना सर्रास दोन व्यक्ती व ट्रिपलसिटही प्रवास करीत आहेत. भाजीपाल्याच्या दुकानांवर गर्दी असून एरव्ही दोन-तीन दिवसांचा भाजीपाला नेणारे नागरिक आता दररोजच भाजीपाला खरेदी करू लागले आहेत. आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन नागरिक तहसील कार्यालयावर गर्दी करू लागले असून यातील अनेक कामे ही अत्यावश्यक नसणारी आहेत व ती लॉक डाऊन संपल्यानंतरही केली जाऊ शकतात अश्या प्रकारची असल्याचे दिसून येते. काही जण तर घराबाहेर पडण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी केवळ निमित्तच शोधत असल्याची चर्चा होतांना दिसते. अशी मंडळी कोरोना विषाणूच्या प्रकोपापासून गंभीर नसल्याचे दिसते.
ग्रीन झोनमध्ये समावेश झाल्याने ४ मे पासून वाशिम जिल्हाधिकारी यांनी लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे. इतके दिवस घरात दडून बसावे लागल्याने आधीच सैरभैर झालेल्या काही लोकांना कधी एकदाचा घराबाहेर पडतो याची वाट शिथिलतेने मोकळी करून दिली आहे लोक लॉक डाऊन मध्ये शिथिलता मिळाली असली तरीही कोरोना विषाणूने देशाचा पिच्छा सोडलेला नाही एवढेच नाही तर लगतच्या अकोला अमरावती व यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रीन झोन मध्ये असल्याचा अविर्भाव आणून जाणे योग्य नाही मात्र मंगरूळपीर येथील बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता लोकांकडून सोशल डिस्टन्स पाळल्या जात नसल्याचे व एकाच वेळी सगळ्या प्रकारची दुकाने उघडी असल्यामुळे लोकांचीही गर्दी होत आहे. त्यातल्या त्यात दारूची दुकाने उघडल्याने तळीरामांना मोकळे रान मिळाले आहे. लोकांची गर्दी वाढतच चालल्याने लॉक डाऊन चे तीन-तेरा वाजत आहेत यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहता अशा प्रकारची दुकाने विशिष्ट प्रकारची दुकाने दुकाने ठराविक दिवशीच उघडल्या जावी जेणेकरून लोकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल व पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर तणाव वाढणार नाही तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन करता येणे व करून घेणे शक्य होईल .नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचा करण्यासोबतच आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी स्वतः काळजी घेणे अपेक्षित आहे अन्यथा ग्रीनझोन मधून किंवा ऑरेंज किंवा मध्ये जाण्यास वेळ लागणार नाही तसे झाल्यास पुन्हा घरात बसण्याची वेळ येऊ शकते याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असेही मतही फुलचंद भगत यांनी मांडले आहे. काही नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नुसार प्रशासनाने एकाच दिवशी सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्याऐवजी विशिष्ट प्रकारची दुकाने ठराविक दिवशी उघडण्याचे नियोजन केल्यास या चक्रानुक्रमामुळे गर्दी कमी होण्यास मदत होऊन फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते तसेच त्यामुळे प्रशासनावरील ताणही हलका होऊ शकतो.त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या स्तरावर नियोजन करुन तसे आदेश पारीत करावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.