मुर्तीजापूर तालुक्यातून काजळेश्वर मार्गे वाशीम जिल्हात नागरिक दाखल
काजळेश्वर चेक पोष्टला बगल देऊन चोट्या मार्गानेअवैध वाहतुक सुरु
काजळेश्वर प्रतिनीधी — नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
काजळेश्वर उपाध्ये : अकोला जिल्हयातून धानोरा पाटेकर मार्गे येणाऱ्यांची छूपी वाहतूक कोरोणा संसर्ग होऊ नये करीता कारंजा तालुक्यातील चेक पॉईन्ट देऊन बंद करण्यात आली होती . मात्र वाहतूक करणाऱ्यां दूचाकीस्वारांनी आपला मोर्चा जूना धानोरा पाटेकर मार्गे वळविला आहे .
प्राप्त माहीतीनुसार काजळेश्वर एसटी शेडजवळील चेक पॉईन्ट चूकऊन अकोला जिल्हयातील धानोरा पाटेकर मार्गे काजळेश्वर दूचाकी वाहतूक जूना धानोरा काजळेश्वर पांदन रस्त्याने आवागमन सुरू केले आहे रेड झोनमधे असलेला अकोला जील्हयाची सिमा बंद असूनही सध्या तरी कोरोणा मुक्त असलेला वाशिम जिल्हया हया चोरटया आवागमनामुळे धोक्यात आला आहे
तेव्हा गावची दक्षता समिती ;पोलीस प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे आहे . दक्षता घेणे ;खबरदारी ठेवणे महत्वाचे असल्याने समंधीत यंत्रेनेने जागरूकता ठेवावी गाफील राहून चालनार नाही असे सुजान लोकांचे मत आहे .