कामरगाव ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिकार्यांची मनमानी.
रूग्ण व नातेवाईकासोबत उध्दटपणा,
जिल्हा शल्य चिकित्सकाकडे तक्रार
कामरगांव प्रतिनीधी धनराज उटवाल { कारंजा हुंकार }
--कारंजा पं स अंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्ण व नातेवाईकासोबत उध्दटपणाने वागत असून त्यांच्याशी अवच्छ भाषेत बोलत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. अखेर 8 मे रोजी कामरगावसह परिसरातील नागरिकांनी जिल्हा शल्य चिकित्साकडे तक्रार दाखल केली असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार कामरगाव येथे गा्रमीण रूग्णालयात डाॅ राठोड हे वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते कार्यरत झाल्यापासून आतापर्यंत त्यांच्या उध्दट वागणूकीबाबत संबंधितांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. डाॅ राठोड हे रूग्ण व नातेवाईकासोबत उध्दटपणाने वागतात. तसेच त्यांच्याशी अवाच्छ भाषेत बोलत असल्याचा आरोप नागरिकांनी तक्रारीतून केला आहे. शिवाय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णाला पुढील उपचारासाठी बाहेरगावी पाठवितांना रेफर सर्टिफिकेट देत नाही. शिवाय त्या रूग्णावर उपचारही करीत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. डाॅ राठोड यांच्या वागणूकीला कामरगावसह परिसरातील नागरिक वैतागले असून आतापर्यंत वरिष्ठांकडे अनेकदा त्यांच्या तक्रारीही करण्यात आल्या. परंतु त्यातील एकाही तक्रारीची चैकशी अथवा कारवाई झाली नाही. सदर वैद्यकिय अधिकार्यांची वागणूक अशीच कायम राहिल्यास तसेच नातेवाईकांचा, रूग्णांचा व गावकर्यांचा संयम सुटल्यास कोणताही अनुचित प्रकार घडु शकतो. त्यामुळे निदान आतातरी डाॅ राठोड यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आरोग्यमंत्र्यासह जिल्हाधिकारी , तहसिलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे. तक्रारीवर राजेश कानकिरड , परशराम कानकिरड, हरिनारायण वानखडे व विनायक वानखडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.