दिव्यांगाना नगर परीषद तर्फे अपंग निधीचे वाटप
प्रतिनीधी अशोक राऊत ( कारंजा हुंकार )
मंगरुळपीर नगर परीषद भागातील दिव्यांगासाठी नगर परीषदेच्या एकुन महसुली ऊत्पंनातुन बांधील खर्च वजा जाता उरलेल्या निधीचा ५% राखीव निधीतुन एकुन१४७ दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वाटप करुन मदत केली आहे
लाॅकडाऊन मुळेवसीलीचे प्रमान ६५% असल्यावर सुध्दा इतर दायीत्वाचे भरपाई न करता अपंग बांधवांना प्राधान्याने कोरोना या संसर्गजन्य प्रादुर्भाव या काळात मदतीचा हात नगर परीषदेकडुन देण्यात आला यामधे प्रत्येक लाभार्थ्यांना दोन टप्यात मदत निधी देण्यात आली रु२५००/- प्रमाने प्रती लाभार्थी मदत करन्यात आली.या करीता मिलींद दारोकार मुख्याधिकारी यांचे पुढाकाराने व सौ डाॅ.गझालायास्मीन मारुफ खान अध्यक्षा नगर परीषद मंगरुळपीर,चंदुभाऊ परळीकर गटनेते,विरेद्रसिंह ठाकुर विरोधी पक्षनेते,तथा माजी ऊपाध्यक्ष यांचे मार्गदर्शनात दिव्यांगाना अपंग निधी खात्यात वळती करन्यात आला या कामी लेखापाल अंकुश गावंडे,सहा.कर निरीक्षक,विजय नाईक व सहा.समाजकल्यान पर्यवेक्षक श्रीपत धोंडगे यांनी सहकार्य केले.