उन्हामुळे वन्य प्राण्यांच्याही जीवाची होत आहे लाही लाही
उन्हाच्या झळा वाढल्या, पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती
वन्यप्रान्यांसाठी कृञीम पाणवठे तयार करन्याची गरज
मंगरुळपीर— अशोक राऊत { कारंजा हुंकार }
-सध्या मे महिना अक्षरशः आग ओकत असुन ऊन्हाची तिव्रताही वाढली आहे अशातच वन्यप्राण्यांच्या जीवाची लाहीलाही होत असुन ते पाण्यासाठी भटकंती करत आहेत त्यामुळे त्यांचेकरीता कृञीम पानवठे निर्माण करन्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
खळखळणारे नदीनाले... पाण्याने तुडुंब भरलेले डोह... झुळझुळ वाहणारे नद्यांचे प्रवाह... किलबिल करणारे पक्षी... कोकिळेचे मंजुळ गाणे... मोरांची म्यॉंव म्यॉंव... वृक्षवल्लींमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार...असे दृष्य आज रानावनात पाहायला मिळत नाही. कारण, निसर्गातील 'जीवन' म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा 'पाणी' नावाचा घटक आटल्याने जंगलात पाण्यासाठी जणूकाही 'लॉकडाऊन' सुरू असल्याचे चित्र अनुभवास येत आहे. पाण्यासाठी वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच करीत आहेत.चैत्र महिनाही संपला आहे. वैशाखही लागला आहे. वैशाखापूर्वीच सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. निसर्गातील नदी, नाले, जलस्रोत आजच आटले आहेत. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे.धरण उशाला कोरड घशाला पडत आहे. देशभर संचारबंदी सुरू आहे. सर्व जग घरांत दडून बसले आहे. जंगलात मात्र कुठलेच 'लॉकडाऊन' नाही. तरीदेखील पाणवठ्याअभावी वन्यजीवांमध्ये 'लॉकडाऊन' सुरू असल्याचे चित्र आहे. पाणी मिळेल या आशेने वन्यप्राणी नागरी वस्त्यांच्या दिशेने कूच करीत आहेत. त्यात कांही हिंस्र प्राण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष उद्भवू शकतो.हे वन्यप्राणी गावाकडे येऊ नये, यासाठी काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेवुन कृञीम पानवठेही तयार केलेत परंतु अजुनही प्रशासनाने लक्ष देवुन वन्यप्रान्यांसाठी पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचे फुलचंद भगत यांनी सांगीतले.जंगलात पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या शासन कोरोनाची उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पाणवठ्यांअभावी जंगलात 'लॉकडाऊन' झाले असल्याने तहानेने व्याकूळ वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. उन्हामुळे नदिनाल्यांसह जमिनीतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी व पक्षी शेतशिवाराकडे येत आहेत. शेतात असलेले रब्बी व उन्हाळी पिकेही संपुष्टात आले आहेत. प्राणी व पक्षी गावालगतच्या शेतवस्तीकडे पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वनविभागाने कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम पाळून योग्य ते नियोजन करून वन्यप्राण्यांकरीता पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत तसेच वन्यप्रेमींकडूनही होत आहे.मंगरुळपीर तालुक्याच्या चहूबाजूंच्या जंगलात हरिण, काळवीट,मोर,लांडोर,ससे,रानडुक्कर, माकड व इतर जंगली प्राणी आहेत. तर जंगलातील क्षेञामध्ये काळवीट व हरणाचे कळपच्या कळप दृष्टीस पडतात. वनविभागाने या वन्यप्राण्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे.
वनविभागाने त्वरित पाणवठे तयार करावेत
दरवर्षी वनविभागाकडून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जंगलात वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे तयार केले जात नाहीत . यावर्षी कोरोनामुळे तर दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. तरी वनविभागाने त्वरित "ऍक्शन मोड'मध्ये येऊन कृत्रिम पाणवठे तयार करावेत. वन्यप्राण्यांसह पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्फे फुलचंद भगत यांचेसह परिसरातील वन्यजीव प्रेमीकडुन केली जात आहे.