पिकेव्हीच्या माजी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११८८११ रु. मदत.... एस पी चव्हान यांची माहीती
मंगरुळपीर प्रतिनीधी अशोक राऊत { कारंजा हुंकार }
सध्यस्थितीत संपूर्ण जगासह भारतामध्ये कोरोना विषाणूंने थैमान घातले असून देशामध्ये महाराष्ट्र राज्याला यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन वेळोवेळी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत व राज्यासाठी एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २००७-२०११
एफ एफ या बॅच च्या माजी विद्यार्थीनी राज्य सरकारला तब्बल ११८८११ रुपयांची आर्थिक मदत ऑनलाईन स्वरूपात प्रदान केली.
कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी शासन व प्रशासन युद्धस्तरावर काम करीत असून सामाजिक बांधिलकी व राज्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिकेव्ही च्या काही माजी विद्यार्थ्यांनी खुखार लेकरं व कॉलेज कट्टा या आपल्या व्हाट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला ग्रुप मधील सहकाऱ्यांनी एकमेकांशी चर्चा करून त्वरित शासनाला आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे निश्चित केले. या मोहिमेमध्ये १०८, माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत फक्त २ दिवसामध्ये तब्बल ११८८११ जमा करून १ मे महाराष्ट्र दिनी ही सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ऑनलाईन स्वरूपात पाठविण्यात आली. या मोहिमेत २००७-११ बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सर्वानुमते सहभाग घेत राज्य सरकारला मदत करून एक आदर्श निर्माण केला असून अशाप्रकारे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठासह इतर ही विद्यापिठाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.विशेष म्हणजे या अगोदर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या तीन बॅचने सुद्धा राज्य सरकारला मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. आतापावेतो पिकेव्ही च्या माजी विद्यार्थ्यांकडून सरकारच्या खात्यात २६२६११ रुपयांची आथिर्क मदत देण्यात आली असून याबाबत महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत आभाराचे पत्र प्रत्येक ग्रुप ला पाठविले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.