पिंपरी मोडक येथे शेतकऱ्याची आत्महत्या.
कारंजा { कारंजा हुंकार } : पिंपरी मोडक येथील शेतकरी विलास नारायण ठाकरे यांनी आपल्या शेतातील विहिरीमध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. सविस्तर माहिती अशी की ग्राम पिंपरी मोडक येथील शेतकरी विलास नारायण ठाकरे हे काल आपल्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले होते पण संध्याकाळी ते घरी न आल्यामुळे त्यांना शोधाशोध सुरु झाली होती पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही पण आज दिनांक 4 मे रोजी शेतातील विहिरीत विलास नारायणराव ठाकरे यांचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले . तेव्हा धनज पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. त्यांच्यामागे चार मुली एक मुलगा आणि आई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्यांमुळे गावात दुःखाचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे