ग्रामीण पोलिसांच्या नेर तालुक्यातून येणाऱ्या चेक पोस्ट वर प्रश्न चिन्ह
कारंजा लाड { कारंजा हुंकार } दि ७ प्रशासनाने जिल्हा बंदी केली असतांना सुध्दा ग्रामीण पोलिसांच्या आर्शिवादाने कोराना संसर्ग झालेल्या रुग्णाला यवतमाळ जिल्ह्यातून कारंजा तालुक्यात प्रवेश दिला जातो. त्यामुळे तालुक्याला कोरोना संसर्गाशी तोंड द्द्यावे लागत आहे. या सर्व प्रकाराला ग्रामीण पोलिसांच्या ग्रामीन भागात व तालुका सीमेवरील असलेल्या चेक पोस्ट जबाबदार असल्याचे चित्र यावरून पहायला मिळत आहे. परिणामी नेर तालुक्यातून कारंजात येणाऱ्या सर्व चेक पोस्ट बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
यवतमाळ जिल्हा हा रेड झोन असताना सुद्धा जिल्ह्यातील नेर तालुक्यातील कोरोना संसर्ग रुग्ण विना अत्याआवश्यक पास शिवाय कसा प्रवेश करू शकतो. या बाबत तर्क वितर्क लावल्या जात आहे. नेर तालुक्यातुन कारंजा तालुक्यात येणारे मार्ग दोनद मार्ग कारंजा व मनभा येवता मार्ग कारंजा, तसेच उबरडा बाजार जांब मार्ग कारंजा व सोमठाणा मार्ग कारंजा असे चार मार्ग असतांना या चारही ठिकाणी तालुका व जिल्हा सीमेच्या चेक पोस्ट असताना पोलीस धनाढ्य नागरिका जवळून चिरी मिरी घेऊन कोरोना संसर्ग असणाऱ्यांना सोडतात का असा प्रश्न निर्माण होत आहे. त्या त्या नेर तालुक्यातील रुग्णांना कारंजा तालुक्यात प्रवेश कोणाच्या आर्शिवादाने दिला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्या मुळे या रुगणाच्या प्रवेशासबंधी त्याच्या कडे पास आहे का तो कोणत्या कारणासाठी कारंजात आला त्याला कोणत्या डॉक्टर ने यवतमाळ जिल्हा सोडून कारंजात रेफर केले. या सर्व प्रकारची तपासणी करून
यवतमाळ जिल्ह्यातून नेर तालुक्यातून येणाऱ्या सर्व चेक पोस्टवर काम करणाऱ्यां व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.