- खेर्डा ते नागझरी रस्त्याचे दोन्ही बाजूंना नाल्या खोदुन देण्याची मागणी.
खोदलेल्या डांबर रस्त्याचे डांबराचा मलमा तसाच पडून.
शेतक-याच्या शेतात पाणी जाण्याची शक्यता
राहुल रविराव यांनी दिले तहसीलदार कारंजा यांना निवेदन.
कारंजा लाड { कारंजा हुंकार }
खेर्डा ते नागझरी या सिमेंट रस्त्यांचे काम नुकतेच पुर्णत्वास येत आहे, यावेळी आधीचा डांबरी रस्ता पुर्नपने ऊकरुन तो मलमा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टाकलेला असुन सदर रस्त्याच्या बाजुचे पाणी जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नाल्या खोदुन देण्याची व शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी रस्ते करुन देण्याची मागणी विळेगाव घुले येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल रविराव यांनी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार कारंजा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे, जर पाऊस चालु झाला तर सदरील रस्त्याचे पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परीणामे शेतकऱ्यांचे शेत पडीत राहु नयेत करीता सबंधीतांनी रस्त्याच्या दुतर्फा नाल्या खोदुन देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने राहुल रविराव यांनी केली आहे