कोरोना मुक्तीचा संदेश देत बेलखेड येथे विवाह संपन्न
कारंजा लाड — { कारंजा हुंकार } दि.१४ मे.
ग्राम.बेलखेड येथील नामदेव वानखडे यांची मुलगी देवका हिचा विवाह लोणी येथील राहुल रामदासजी सगडे याचा सोबत संपन्न झाला,
संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले,त्यामुळे आपल्या भारतात लॉकडाऊन असल्यामुळे विवाह करणे कठीण होत आहे,अश्या प्रसंगात समाजाला आदर्श निर्णमा करणारा विवाह सोहळा बेलखेड येथे संपन्न झाला, या विवाह प्रसंगी शासनाच्या नियमांचे पालन करत,9 लोकांमध्ये हा विवाह मोबाईल वर मंगलाष्टका लावून, संपन्न केला,या वेळी जि.प.सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांनी वधू वर यांच्या कडून कोरोना मुक्तीची शपथ वाचन करून , वधू वर पक्षांनी आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करू व या कोरणाच्या संकटातून स्वतःचे व कटुंबाचे काळजी घेऊ,आम्ही सुक्षित तर देश सुरक्षित,कोरोना योद्धा होऊन आम्ही कोरणा मुक्तीच्या लढ्यात सामील होऊ अशी शपथ घेतली,या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच मीनाताई साऊथ यांच्या कडून वधू वर यांना सॅनिटाइझर देण्यात आले,व ग्रामपंचायत कडून गावात सॅनिटाइझर वाटण्यात आले.जि.प.सदस्य डोईफोडे यांनी वधू वराला आशिर्वाद देत असे विवाह समाजासमोर आदर्श निर्माण करतात, असे जर विवाह झाले तर कोणत्याच मुलीच्या वाडीला कर्जबाजारी व्हायची वेळ येणार नाही असे प्रतिपादन केले,या वेळी गावातील पोलीस पाटील शंकर मोरे,तंटा मुक्ती अध्यक्ष राजेंद्र वानखडे,प्रतिष्ठित नागरिक सुरेश बहुटे,आमटे व पाहुणे मंडळी उपस्थित होते,सर्वांच्या आशीर्वादाचा सोसिएल डिस्टनसिंगचे पालन करत हा विवाह सोहळा संपन्न झाला.