कोराणा संचारबंदी निमित्त कामरगांव येथे पोलीसांचे पथसंचलन
नियमांचे पालन करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन
कामरगांव प्रतिनीधी — धनराज उटवाल ( कारंजा हुंकार )
कोरोणा संचारबंदी निमित्त जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार धनज पोलिस स्टेशन च्या वतीने कामरगांव येथे दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. गावातील प्रमुख मार्गासह पथसंचलन करण्यात येवुन संचारबंदी चे कडेडोट पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले .
सविस्तर असे की संपुर्ण सुरू असलेला कोरोणा संसर्गजन्य आजाराचा चा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लाॅकडाउन घोषित केला . सर्वत्र १४४ कलमनुसार जमाव बंदीच्या आदेशानंतर संचार जाहीर करण्यात आली .
उपविभागीय पोलीस अधिकारीयांचे मार्गदर्शनात आठवडी बाजार चौकातुन पोलीस पथसंचलनास सुरूवात करण्यात गावातील प्रमुख मार्गासह गणपती मिरवणुक मार्ग।पथसंचलन करण्यात आले.
या पथसंचलनात ठाणेदार सोमनाथ जाधव , उपपोलीस निरीक्षक कपील मसके यांचे सह पोलीस विभागाच्या कर्मचा-या सह आर .सी. पी. पथक सहभागी झाले होते .या संचारबंदी दरम्यान घराच्या आत राहुन शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस विभागाचे वतीने करण्यात आले .