कोरोनासाठी हिमाचल मॉडेल वापराची सूचना राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावी
काँग्रेस सेवादल चे अॅड संदेश जैन जिंतुरकर व अब्दुल राजिक कडुन मागणी
कारंजा लाड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीहि माचल प्रदेश मॉडेलचा विचार करावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारने राज्यातल्या सर्व जनतेची तपासणी केली. शरीरात शीतज्वराची लक्षणं असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झालेल्या व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. याच मॉडेलचा वापर करण्याची सूचना मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली आहे सबब पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेली सूचना अंमलात आणून राज्य सरकारने हिमाचल प्रदेश मॉडेलचा वापर करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अॅड. संदेश जैन जिंतूरकर व वाशिम जिल्हा कांग्रेस सेवादल चे सरचिटणीस अब्दुल राजीक यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे
या पत्रकात म्हटके की,महाराष्ट्र सरकारने सर्व रेड आणि ऑरेंज झोनमध्ये हिमाचल मॉडेल राबवण्याची गरज आहे त्याद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांचे स्क्रीनिंग करने आवश्यक आहे शिवाय काळजी म्हणून लोकांनी कोरोनाशी संबंधित लक्षणं आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून प्रशासनाला स्वत: सांगावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे
हिमाचल प्रदेशची लोकसंख्या ७० लाख असून राज्यातल्या सगळ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. शरीरात इन्फ्लुएंझा सदृश्य लक्षणं आढळतात का, यासाठी हिमाचल प्रदेश सरकारनं मोठ्या प्रमाणात तपासण्या केल्या आहेत असे माध्यमाद्वारे समजले आहे माध्यमांनी दिलेल्या बातम्यांवर नजर टाकली तर हिमाचल मध्ये असे दिसून येते की,
सोळा हजार अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन त्यांच्या राज्यातल्या जनतेच्या तपासण्या केल्या या दरम्यान १० हजार जणांमध्ये इन्फ्लुएंझा सदृश्य लक्षणं आढळून आली. यापैकी दीड हजार जणांची प्रकृती औषधोपचारांनंतरही सुधारली नाही. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. हिमाचल सरकारनं दर १० लाख लोकांमागे ७०० जणांच्या चाचण्या घेतल्या. सर्वाधिक कोरोना चाचण्या घेणाऱ्या (दर दहा लाखांमागील) राज्यांच्या यादीत हिमाचल पुढे आहे. हिमाचल मॉडेल वापरले गेले तर कोरोना आजाराबाबत केलेल्या उपाययोजना म्हणून हे मॉडेल प्रभावी सिद्ध होईल अशी अपेक्षा या पत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे