काजळेश्वर येथील आदीवासीना प्रकाशदादा डहाके कडून जिवणाशक किटचे वाटप .
शिव भोजन कक्ष सुरु करण्याची मागनी
कारंजा लाड { कारंजा हुंकार } : सद्या कोरोणा विषाणुने बाजुच्या जिल्हात मोठ्याप्रमानात थैमान घातले असतांना वाशिम जिल्हा कोरोणा मुक्त रहावा करीता लॉक डाऊन कडक व संचारबंदी सुरु आहे . घरातच रहा या शासन प्रशासन आदेशान्वये येथील आदीवासी
आर्थिक दुर्बल महीलांवर उपासमारीची पाळी येऊ नये करीता त्यांना संचारबंदीच्या काळात आधार व्हावा करिता कारंजा येथील माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांनी त्यांना धान्य वाटप करून आधार दिल्याची माहीती सौ . ज्योती ताई गणेशपूरे यांनी दिली.प्राप्त माहीतीनुसार येथील आदीवासी समाज लॉक डाऊनमुळे आपल्या पालात आहे उपजीवीकेचे दुसरे साधन नसतांना त्यांना दोन वेळचे जेवन मिळावे करीता त्यांनी आर्थिक दृष्या गरीब असलेल्याची बाब मा प्रकाशदादा डहाके यांच्या निदशनास आनुन दिल्यामुळे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांनी गरिब नागरिकांना जिवनाशक वस्तुच्या किंटचे वाटप करण्यात आल्याची माहिती माजी जि प अध्यक्ष सौ ज्योतीताई गणेशपुरे यांनी दिली तसेच ज्या गावात पाच हजार लोक वस्तीचे गाव आहे अशा गावात शिव भोजन कक्ष सुरु करुन गरिब नागरिकांना ५ रुपयात जेवन मिळेल अशी त्यामुळे शिव भोजन कक्ष सुरु करण्याची मागणी ज्योतीताई गणेशपुरे यांनी केली आहे