बांधकामाचा मुरूम फैलवताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यावरील छत तूटले
खेर्डा बु येथील घटना
गावकऱ्यांची कार्यवाहीची मागणी
पोलिसांच्या मध्यस्तीने प्रकरण मिटले
कारंजा लाड दि.5 तालुक्यातील ग्राम खेर्डा बु येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील राहुल कृषी सेवा केंद्र च्या मालकीच्या जागेवर मुरूम फसरविण्याचं काम जे सी पी ने सुरू असताना अचानक जेसीपीचा धक्का बाजूला असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला लागल्याने अचानक डोक्यावरील छत तुटले. त्यामुळे बाबासाहेबा चा हातालाही धक्का लागून हात तुटल्याची घटना दि.5 मे रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर असे ग्राम खेर्डा बु येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आबेडकर याच्या पुतळा परिसरात राहू कुषी सेवा केंद्र चे बांधकाम सुरू असताना खेर्डा ते नागझरी रस्त्यावरील मुरूम आणून फसरविण्याचं काम त्याच रस्त्याच्या ठेकेदारांच्या जेसीपीने सुरू होते. बाजूला असलेल्या पुतल्यावरील छत जेसीपी चा धक्का लागल्याने तुटून पडले. त्यामुळे ते छत हातावर पडल्याने हात सुद्धा तुटले. त्यामुळे राहुल कुषी सेवा केंद्र चे चालक राहुल शेषराव कडू व रस्त्याचे ठेकेदार व जेसीपी चालक सुखचंद गजलाल याच्यावर कार्यवाही करा अशी मागणी गावकऱ्यानी केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी संजय पाटील व ठाणेदार इंगळे यांच्या सह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल होऊन कार्यवाही किंवा मध्यस्ती करून पुतळ्या चे शानदार बांधकाम करण्याचे ठरविण्यात आले. अश्या परिस्थिती गावकऱ्यांनी सहकार्य केले. तपास पोलीस उपनिरीक्षक शेमडे करीत आहे .
प्रतिकिया
*खेर्डा बु गावातील नागरिकानी सत्य परिस्थितीची माहीती घेऊन सहकार्य केले. झालेली घटना ही अनवधानाने झाली असली तरी संबंधितावर 295/34 गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण ठेकेदार व केंद्र चालक व गावकऱ्यामध्ये सामंजस्य ठेऊन पुन्हा पुतळ्याचे बांधकाम करण्याचे ठरले*
उपविभागीय पोलीस अधिकारी
संजय पाटील कारंजा