टिडीआरएफ च्या 15 व्या वर्धापन दिना निमित्त मास्क व सॅनिटायझर चे वाटप व जनजागृती
टिडीआरएफ चे राष्ट्र सेवेत कार्य निरंतर
- टिडीआरएफ संचालक हरीश्चंद्र राठोड
कारंजा लाड — दिलीप रोकळे { कारंजा हुंकार }
TDRF ला आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करत असताना 9 मे 2020 रोजी 15 वर्ष पूर्ण झाले.त्या निमित्ताने विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यातील TDRF जवानांनी सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा केला. दरवर्षी TDRF वर्धापन दिन हा सर्व TDRF जवान एकत्रित येऊन साजरा करीत असतात. परंतु यावर्षी Covid-19 मुळे लॉकडाऊन झाल्याने एकत्रित येऊ शकत नसल्यामुळे सर्वांनी आपापल्या तालुक्यांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा केला.
कारंजा तालुक्यात TDRF च्या वतीने TDRFसंस्थापक संचालक यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात शहरातील व ग्रामीण भागातील गरजूंना शेतमजूरांना व निराश्रीतांना, 100 मास्क व 100 सॅनिटायझर बॉटल चे वाटप केले.तसेच कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात पोलिस पाटील व सरपंच यांना भेटून संपूर्ण गावात फिरून स्वच्छतेविषयी, सामाजिक अंतर ठेवण्याबाबत,व Covid-19 विषयी जनजागृती केली व Covid-19 मध्ये कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती देण्यात आली.या उपक्रमासाठी TDRF संचालक यांच्या नेतृत्वात TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस व कार्यालयीन अधीक्षक सौरभ वडे कार्यरत आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कारंजा कंपनीतील मुरली लोमटे,कबीर इंगळे, आदित्य जाधव,पुजा ठाकरे,श्रृती लडबडे,शिवानी चव्हाण,साक्षी निकम ,ॠषिकेश कनोजे,भूमिका खाडे, समीक्षा बांडे इत्यादी जवानांनी मास्क व सेनीटायझर वाटपाचे विशेष कार्य केले. कारंजा मध्येच नाही विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वर्धापन दिना निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
एवढेच नाही ही तर लॉकडाऊन झालेल्या तारखेपासून सतत आज पर्यंत TDRF जवानांकडून अडकलेले परप्रांतीय मजूर, विद्यार्थी, गावातील निराधार, निराश्रित,दिव्यांग, मनोरुग्ण अशा सर्व स्तरावरील घटकांना रोज टिफिन देऊन जेवणाची व्यवस्था करीत आहेत व प्रत्येक गावात जनजागृती करित आहेत.सोबतच कोरोना मुळे कर्तव्यावर असणार्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना चहा,बिस्कीट चे वाटप करून त्यांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करीत आहे.
मागील 15 वर्षापासून TDRF नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये पीडितांची मदत करीत आहे.TDRF ने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर अनेक शोध बचाव कार्यामध्ये TDRF चा सहभाग मागील 15 वर्षापासून सतत आहे. TDRF संचालक तथा संस्थापक हरीश्चंद्र ब. राठोड यांचा वाढदिवसाच्या दिवशी TDRF चा वर्धापन दिवस साजरा केला जातो.