काजळेश्वरचे उपाध्ये दाम्पत्य कोरोणा फायटर मध्ये योद्धा म्हणून काम करीत आहेत .
त्यांच्या कर्तृत्वाचा गावकऱ्यांना अभिमान आहे.
काजळेश्वर उपाध्ये — नकुल उपाध्ये { कारंजा हुंकार }
काजळेश्वर उपाध्ये : येथील डॉ . विशाल हरीश्चंद्र उपाध्ये तसेच त्यांच्या सुविध्ध्य पत्नी डॉ . सुक्ष्माताई विशाल उपाध्ये हे दाम्पत्य कोरोणा महामारीच्या युध्दात योद्धा म्हणून काम करीत आहे . त्यांच्या रुग्णसेवेचा गावकऱ्यांना अभिमान आहे .
प्राप्त माहीतीनुसार काजळेश्वर
येथील डॉ. विशाल उपाध्ये हे कोरोणा विषाणूचा संसर्ग ग्रामस्थांना होऊ नये करीता तालूका आरोग्य अधिकारी किरण जाधव यांनी दिलेल्या कामा नुसार लोहगांव चेक पोष्ट वर आरोग्य तपासणी करीत आहे . तर डॉ . सुक्ष्माताई विशाल उपाध्ये हया कारंजा उपजील्हा रुग्णालय येथे सतत कोरोणा रुग्ण तपासणीत कामकरीत आहे . वैयकीय व्यवसाय स्वीकारलेले हे दाम्पत्य कोरोना फायटर करीता एक योद्धा म्हणून काम करीत आहे . त्यांच्या कार्याचा गौरव आहे गावकऱ्यांना त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान असल्याचे माजी सरपंच तुळशीराम पा. उपाध्ये ' . सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर पा उपाध्ये यांनी म्हटले आहे .