विना रुग्ण अवैधरित्या फिरणाऱ्या दोन रुग्णवाहिकेवर धनज बु।। पोलिसांनी केली कारवाई....
धनज बु प्रतिनीधी — अंकुश कथे कारंजा हुंकार
।। धनज पो.स्टे. अंतर्गत येणाऱ्या ढंगारखेड चेकपोस्ट वर विनारुग्ण अवैधरित्या फिरणाऱ्या दोन रुग्णवाहिकेवर धनज पोलिसांनी कारवाई करत त्या रुग्ण वाहिका ताब्यात घेतल्या आहे....
सदर माहितीअशी आहे की, दिनांक 17 एप्रिल ला ढंगारखेड चेक पोस्ट वर MH - 27 C 5730 हि रुगवाहिका अमरावती येथुन आली . त्या रुगवाहिका चालक कडे कुठला ही परवांगी नसताना ते अवैधरित्या रुग्णवाहिका फिरवत आहे व संचारबंदी चे तसचे जिल्हाबंदी चे व तसेच कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्याची संभव माहित असताना हायगयीचे कृत्य केल्या प्रकरणी आरोपी मोहम्मद एहसान मोहम्मद सुलतान याचा वर 188, 269 भा द वि सह साथ प्रतिबंधक अधिनियम 1897 कालम 3 यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घटना 17 एप्रिल ला पुन्हा ढंगारखेड चेक पोस्ट वर घडली आहे...MH - 19 J 2489 हि रुग्णवाहिका अमरावती येथून येत होती...चालक शेख मतीन मुखद्दर हुसेन याचा वर कलम 188, 269 भादवि सह रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 3 नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...कोरोना व्हायरस मुळे जिल्ह्या च्या सीमा बंद असून देखील अशा प्रकारे अवैधरित्या रुगवाहिका फिरत असल्यामुळे व रुग्णाच्या सेवे साठी असणाऱ्या वाहनाचा दुरुपयोग केल्या जात असल्यामुळे धनज पोलिसांनी हि कार्यवाही केली आहे...पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक सुरेश सोनुने करत आहे....