कोरोना पार्श्वभूमीवर नियम तोडणाऱ्यावर पोलिसांचा दणका
10 हजार रुपये दंड वासून
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
दि.19 जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांनी कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या एकूण 85 वाहनावर व 50 लोकांवर विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करून 36100 रुपये दंड वसूल करण्यात आला. ठाणेदार याच्या कारवाईचे कौतून करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संचारबंदी दरम्यान नियम तोडणाऱ्या एकूण 85 वाहनवर व दुकान मालकावर कलम 188, 269 भा.द.वी.सह कलम 51 नैसर्गिक आपती व्यवस्थापन सन 2005 कार्यवाही करून दोषारोपपत्र मा कोर्ट कडे सादर करण्यात आले. व 26 हजार 100 दंड वसूल करण्यात आली. तसेच तोंडाला मास न लावणाऱ्या 50 लोकांवर आतापर्यत 200 प्रमाणे 10 हजार रुपये दंड असा एकूण 36 हजार 100 रुपये दंड वसुल करन्यात आल्याची कार्यवाही ठाणेदार सतीश पाटील करण्यात यांनी केली.