. पञकार सुधिर देशपांडे यांचेवर लादलेले खोटे गुन्हे मागे घेऊन दोशी पोलीस कर्मचारी याचेवर गुन्हा दाखल करण्यांची मागनी — राहुलदेव मनवर
पोलिस महानिरीक्षक अमरावती यांना निवेदन सादर
कारंजा लाड दि २४ ( कारंजा हुंकार )
राज्यात कोरोना च्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन असल्याने व कलम १४४ लागू असल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधे मोठा पोलिस बंदोबस्त आहे. मात्र शासनाने दि.२०.४.२०२० पासून शेती, बांधकाम सह अनेक कामांना मुभा दिलेली असतांना कारंजातील पोलीसांनी दि.२१ तारखेला शेतकरी असणार्या पत्रकार सुधीर देशपांडे रा.कारंजा हे कारंजा शहर पोलीस स्टेशन हद्दितील आपल्या शेतातील टरबुजांना खत देण्यासाठी स्कुटी गाडीवर खताचं पोतं घेवून जात असतांना त्यांना एकुण ३ पोलिस कर्मचार्यांनी थांबवीले व समर्पक शहानिशा झाल्यानंतर सुद्धा जबर मारहान केली. सुधीर देशपांडे हे जेष्ठ नागरीक, शेतकरी व पत्रकार असल्याने काही प्रतिष्ठीत नागरिकांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात कारंजा शहर पोलीस स्टेशनला दि.२१.४.२०२० ला याबाबत तक्रार दाखल केली. मात्र सदरच्या तक्रारीचा राग मनात धरून व तालुक्यातील पत्रकारांनी पोलीसांविरूद्ध बातम्या छापू नये या ऊद्देशाने कारंजा ग्रामीणच्या पोलीस सेवेत असणार्या पोलीस कर्मचार्याने IPC च्या कोणत्याही दखलपात्र वा अदखलपात्र कलमाच्या गुण्ह्याची घटना घडलेली नसतांना व घटनास्थळ बदलवलेले दाखवून स्वत: कार्यरत असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन डायरी अंमलदारास खोटे बोलून व पोलीस निरीक्षक यांना हाताशी धरुन त्यांचेकडून देशपांडे यांचे विरुद्ध खोटा FIR नोंदवून घेवून त्यामधे अनेक गंभीर गुण्हे दाखल करवून घेतले. त्याचबरोबर देशपांडे यांना मारहानीची घटना शहर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेली असतांना व त्याची तक्रार दिलेली असतांना सदरच्या ३ पोलिसांवर गुण्हा दाखल केला नाही. ही बाब कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणार्या पोलीस खात्याला काळीमा फासणारी आहे. काही वर्षापुर्वी खेर्डा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना झाल्यानंतर तात्कालीन ठाणेदार नंदकुमार काळे यांनी एका वर्गाच्या ४२ लोकांवर १६-१६ गुण्हे नोंदवून आरोपी करून त्यांना ४५ दिवस जामीन मिळू दिला नव्हता. व सेंट्रल जैल अकोला येथे त्यांना जैल भोगावे लागले होते. याकरीता दि.३०.१.२०१३ ला या प्रकरणी मी राज्याचे तात्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली होती. त्यावर त्यांनी दि.३१.१.२०१३ ला सदरचे गुण्हे मागे घेण्यासंदर्भात पोलीस अधिक्षक वाशीम यांना पत्र पाठवले होते. १३.३.२०१९ ला संदीप रामदास गजभीये रा.कारंजा अशा अनेक नागरीकांना कारंजा पोलीसांकडून न्याय मिळत नाही. परिणामी अन्यायाचे जिवण जगावे लागते. काहींना गावं सोडुन जावे लागते.
करीता महोदय, विनंती की, कृपया सुधीर देशपांडे या नागरीकावरील गुण्हे मागे घेण्याची प्रक्रीया तात्काळ सुरू करावी. तसेच पोलीस खात्यातील कर्मचार्यांकडून असे प्रकार यापुढे होवू नयेत याकरीता सोबत जोडलेल्या सुधीर देशपांडे यांच्या तक्रारीवर पुढील कारवाई करावी