कोरोणा युद्धात आरोग्याला जपा आणि रोगप्रतीकारशक्ती वाढवा
आरोग्य अधिकारी डॉ . वाघमारे
यांचे ग्रामस्थांना आवाहन .
काजळेश्वर उपाध्ये दि २७ ( कारंजा हुंकार )
: वाशिम जिल्हा सद्दातरी कोरोणा मुक्त असला तरी
धोका टळला नाही छुप्या मार्गाने येणारे यापासून गावातील दक्षता समितीने जागरुक असून शासनाचे निर्देश पाळावेत आणि आपली स्वताची रोगप्रतीकारशक्ती कोरोणाला
हरविण्यासाठी वाढवावी असे आवाहन आपल्या आरोग्य पथकास मार्गदर्शन करतांना गावकऱ्यांना दि .२७ एपील रोजी केले आहे .
प्राप्त माहीतीनुसार वाशिम जिल्हा कोरोणा मुक्त झाला असला तरी गाफील राहून चालणार नाही
छूप्या मार्गाने येणाऱ्या दोघांची आरोग्य तपासणी करुन त्यांना दक्षता समितीने समाज मंदीरात कोरोनटाईन केले असल्याची माहीती येथील आरोग्य अधीकारी डॉ. वाघमारे यांनी दिली असून दक्षता समिती ग्रामपंचायत पथक तथा आरोग्य पथकाला अधीक सजगता ठेवावी लागेल असे सांगत गावकऱ्यांनी कोरोणाला हरविण्यासाठी आपली स्वताची रोगप्रतीकारशक्ती वाढवावी त्यात सकाळी प्राणायम करणे : सत्व युक्त आहार घेणे ;चवनप्राशचे सेवन करणे कोरोणा थायराईड डिसीज असल्याने
आलं ;सुंठ ;मीरे ;लवंग : हळद :तुळशीचे पान टाकून काळा काढा निंबूचा थोडा रस टाकून तीन वेळा घेणे ;सकाळ संध्याकाळ गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या करणे ;सकाळ संध्याकाळ निंबु ;गरम पाणीपीणे यामुळे गळयात खरखरी राहणार नाही . तसेच नाकात तीळाचे तेल एक थेंब टाकावे त्यामुळे श्वसन क्रिया चांगली राहून आरोग्य चांगले राहत . तेव्हा घरातच थांबा शासनाच्या सूचनाचे पालन करा आणि जबाबदारीने वागा असा संदेश
डॉ . प्रशांत वाघमारे यांनी गावकऱ्यांना दिला आरोग्य पथकात डॉ. वाघमारे सह संदीप खुळे कैलास उपाध्ये : योगिता वानखडे ;मंजू जाधव : ए.जी सोनोने यांच्यासहआशा वर्कर काम करीत आहे .