ग्रामसचिव गजानन उपाध्ये गावच्या मुख्य रस्त्याने ग्रामस्थांना दंवडीची व्यवस्था नसतांना स्वता दवंडी देऊन
शासन आदेशाची देतात माहीती .
काजळेश्वर उपाध्ये नकुल उपाध्ये कारंजा हुंकार
: ग्राम जानोरी पानगव्हान गट ग्रामपंचायतचे ग्रामसचिव गजानन उपाध्ये हे स्वता दवंडी पीटऊन ग्रामस्थांना शासन आदेशाची माहीती स्वता देतात . त्यांचा हा अभिनव उपक्रमाचे कौतूक
जानोरी ग्रामस्थ करतात .
प्राप्त माहीतीनुसार जगभरात उसळलेला कोरोनाचा उद्रेक देशात पसरून आपल्या घरापर्यन्त पोहचू
शकतो .कोवीड-१९ यावर समस्त जगात अजूनही औषध उपलब्ध नाही . राज्यात मोठया प्रमाणात कोरोना फैलतो आहे त्या संदर्भात केंद्र तथा राज्य सरकारने नागरिकांचे निरोगी स्वास्था करीता घेतलेले निर्णय गावपातळीपर्यन्त पोहोचविण्यासाठी गावात दवंडी पीटविली जाते . मात्र जेथे दवंडी पीटवणारा नसेल तर ती माहीती ग्रामस्था पर्यन्त पोहोचविण्याकरीता
जाणोरी ग्रामपंचायतचे ग्रामसचिव स्वता गावचे मुख्य रस्त्याने फिरुन दवंडी पीटऊन शासन आदेश सांगत आहेत .कोरोणा विषाणूचा संसर्गाची कारणे त्याकरीता सोशल डिस्टन्सींग : शिंकतांना खोकतांना मास्क वापरणे ;हात वारंवार धूणे '
कोरोनाची चेन तोडण्यासाठी घरातच
थांबने त्याकरीता साथरोग नियंत्रन कायदा व १४४ कलमची माहिती स्वता ग्रामस्थांना दवंडी द्वारा देतात त्यांच्या या समाज उपयोगी ग्रामस्थांच्या निरोगी स्वास्थासाठी
कोरोणा आपल्या दारापर्यत न पोहोचणे करीता खबरदारीचा उपाय असून ग्रामसचीव उपाध्ये यांचे कार्य
कौतूकास्पद असल्याचे मत काजळेश्वर सर्कलचे जीप सदस्य अशोकराव डोंगरदीवे ह्यांनी व्यक्त केले . गावकरीही ग्रामसचीव गजानन उपाध्ये यांच्या कामामुळे समाधानी असल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष हभप एकनाथ महाराज भींगारे ;पोलीस पाटील विनोद पाटील भींगारे यांनी सांगीतले .