भांबदेवी येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात.
मदतीची मागणी
कारंजा लाड — ( कारंजा हुंकार )
: यावर्षी पाऊस भरपूर झाला म्हणून गावात बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेताततल्या पाण्याचा चांगला उपयोग कराव म्हणून भाजीपाला पिकांची निवड केली, त्यात कुणी कारली लावली तर कुणी टमाटर कुणी फुलकोबी लावली तर कुणी ढेमसे, भेंडी, बरबटी,मिरची इत्यादी भाजीपाला पिकाची लागवड केली. रात्री बेरात्री पानी दिल्यावर व दिवसभर मेहनत केल्याने पिकही चांगलेच बहरले होते.या वर्षी भाजीपाला पिकातून चांगले उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. भाजीपाला पिकाचा भाव कधीच नक्की नसतो, या गोष्टीचा अनुभव होता, परंतु काही न काही हाती पडेल ही खात्री होती. परंतु ऐन पिक तोड़नीच्या वेळेस कोरोनाचा रोगाचा प्रादुर्भाव झाला व जिल्हा बंदी व लॉक डाउनमुळे शेतातील पीक शेतातच खराब होऊन फेकन्याला शेतकरी मजबूर झाला आहे.सध्या भाजीपाला पिकाला लावलेला खर्चही वसूल झाला नसून जवळ असलेले जमापुंजी खर्च झाल्याने प्रत्येक शेतकरी संकटात सापडला आहे.
भांबदेवी येथे चंदू ढाकुलकर,धीरज फुलमाळी,अतुल मुंदे, राहुल मुंदे,पंकज मेश्राम, बाळू मुंदे, भूषण कस्तुरे,पीयूष मुंदे,गणेश बिजवे,सचिन जिचकार आदी भाजीपाला उत्पादक शेतकरी असून शेतीवर लावलेला खर्चही वसूल न झाल्याने महसूल विभागाने पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
"मी अर्धा ऐक्कर टमाटर अर्धा ऐक्कर कारले,आणि 20 गुंठ्यांत मिरची ची लागवड केली होती. मला जवळपास 2.5 लाख रु खर्च आला.मला 6 लाख उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती परंतु लॉक डाउन मूळे शेतातील माल शेतातच खराब झाला आहे त्यामुळे लावलेलाही खर्च ही भरून निघणे कठीण आहे"
अतुल गुलाबराव मुंदे ,
भाजीपाला उत्पादक शेतकरी, भांबदेवी.