गर्भवती महिलाचा सकस आहार तीन महिण्यापासुन बंद
कारंजा प्रतिनीधी — ( कारंजा हुंकार )
कारंजा तालुक्यातील ग्रामीन भागात गर्भवती महिलाना व स्थनपान माताना व सहा महिण्याच्या ते तीन वर्षा पर्यत च्या लाहाण बाळाला हा आहार दिला जातो पण आता कोरोना च्या आजाराणे थयमान घातल्याने गेल्या तीन महिण्यापासुन सकस आहार मिळाला नसल्याची चर्चा आहे सरकार सर्वञ धान्य वाटप करत असताना माञ ज्याच्या सांठी आहाराची आवशकता आहे अशा माताना या आहारापासुन वंचित ठेवल्या जात आहे .
गर्भवती महिलेची तीसऱ्या महिण्यापासुन
योजनेसाठी नोंद करुन चौथ्या महिण्यापासून योजनेचा लाभ दिला जातो. गर्भवती महिलनां याेजने अंतर्गत मिळणाऱ्या धान्य, साहित्याचा सकस आहारामध्ये नेटाने वापर व्हावा या उद्देशाने दोन महिन्याच्या कोट्याचे एकदम वाटप करण्यात येतो.
पूर्वीच्या पिशवीबंद आहाराच्या तुलनेत अंगणवाडी स्तरावर मिळणारे धान्यादी साहित्यांमुळे गर्भवती महिलांना आता थेट घरी सकस आहार बनवता येत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान तीसऱ्या महिण्यात नोंदीनंतर गर्भवती महिलेस प्रसुतीपर्यंत या योजनेचा लाभ मिळत असून प्रसुतीसाठी स्थलांतरीत महिलेस ज्या त्या ठिकाणच्या अंगणवाडीतून लाभाचे सक्त आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे पिशवी बंद सकस आहाराच्या तुलनेत थेट मिळणाऱ्या टीएच आर धान्य वाटपातून गर्भवती महिलांच्या पोषणाला बळकटी मिळत आहे. या योजनेअंतर्गत धान्य, साहित्याचे प्रमाण (दोन महिण्यासाठी)
गहू - तीन किलो ७७५ ग्रॅम पॉकीटे (एक किंवा दोन) चवळी - एक किलो मसुर - ९५० ग्रॅम
सोयाबीन तेल - ५०० ग्रॅम मिरची पावडर - २०० ग्रॅम हळद - २०० ग्रॅम मिठ - ४०० ग्रॅम या प्रमाने गर्भवती महिलाना सकस आहार मिळत होता ते गेल्या तीन महिण्यापासुन बंद असल्याने त्या महिलाना होणार्यांबाळाना अशकत पना होऊ शकतो शासनाने हे धोरन याकरीता राबवले होते ती महिलाना हा सकस आहार दिला तर बाळ मजबुत जन्माला येवु शकते याकरीता हि योजना शासनाने सुरु केली होती ती गेल्या तीन महिण्यापासुन बंद असल्याने या महिलाना तो सकस आहारा पासुन वंचित राहावे लागत आहे तरी वरीष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देउन गर्भवती महिलाना सकस आहार देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे