कामरगांव येथे जुगारावर स्था. गु. शा. धाड ९ जणावर गुन्हा दाखल
कामरगांव — मुन्ना उटवाल (कारंजा हूंकार )
झाडबाबा दरगा जवळील पोलट्री फारम मध्ये जुगार चालू असल्याची गुप्त माहिती स्था. गु. शा. ला वाशीम ला मिळाली . धाड टाकली असता ५२ पत्तासहा ८६६०रुपये जपत करून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये सै. इरशाद सै. ईसलाम काझी, तैसीमखान अजीमखान, कलीम बेग अयुब बेग, शे. रिजवान शे. उस्मान, सै. इरफान सै ईसलाम काझी, आरीफोदिन अमीरोदिन, अशरफ अली शकदर अली, इमरान खान मुसुबखान, सर्व रा. कामरगांव व नंदलाल ठाकूर यांच्या वर मुंबई जुगार अॅक्ट १२अ, सह कलम १८८,२६९,२७०,२७१,२९०,२९१नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. उपनिरीक्षक भगवान पायघन स्था. गु. शा. वाशीम कर्मचारी करीत आहे