काजळेश्वरात नित्त्याने फीरते ग्रामपंचायतची कोरोणा संसर्गापासून सावधान करणारी 'शासनाच्या
सूचना सांगणारी व ;ग्रामस्यांना सजग
करणारी सुचणा प्रसारण व्हॅन .
काजळेश्वर उपाध्ये :नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
वाशिम जिल्हयालगत असणाऱ्या जील्हयात
कोरोणा संसर्ग वाढतांना दिसत असल्याने वाशिम जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रवेशबंदी कडक केली आहे वाशिम जिल्हा कोरोणा मुक्त रहावा
करीता जिल्हा प्रशासनाने आदेशान्वये गावात छूप्या मार्गाने कोणी येऊ नये तसेच जील्हा प्रशासनाच्या वेळीवेळी देण्यात येणाऱ्या सूचना ग्रामस्यांपर्यत्त पोहोचाव्या करीता दि . २७ एप्रील पासून सकाळी ८ते १२ह्या वेळेत काजळेश्वर ग्रामपंचायतचे पुढाकाराने दक्षता तथा आरोग्य पथकाचे सूचने
नुसार कोरोणा संदर्भात माहिती देणारी व्हॅन गावच्या प्रमुख मार्गाने फिरत आहे .
प्राप्त माहीती नुसार कारंजा तहसीलदार धीरजमांजरे यांनी केलेल्या नियोजना नुसार कारंजा ग्रामीण पोलिस तथा पोलिस उपविभागीय अधीकारी यांच्या समन्वयातून परजील्हयातून होणारी
घुसखोरी थांबविण्याचे दृष्टीने चेक पॉईन्ट वाढविले आहे . जानोरी ;खानला ;खानापूर रोडवर
चेक पॉईन्टसुरू केल्याने छूप्या मार्गाने होणारी वाहतूक थांबण्यास मदत झाली ही माहिती तसेच गावात छूप्या पद्धतीने कोणी प्रवेश केला तर
गावची दक्षता समितीला ;पोलीस पाटील ;ग्रामपंचायत प्रशासनास कळवावे तसेच गांव कोरोना विषाणू पासून मुक्त राहण्यासाठी लॉक डाऊनचे पालन करावे . सर्दी पडसा
खोकला ताप घसा खवखवणे अशी
लक्षणे दिसताच कारंजा येथे फिव्हर
हॉस्पीटल सुरु आहे तेथे तपासणी करावी . अत्यावश्यक वेळी बाहेर पडायचे झाल्यास तोंडाला मास्क बांधावा संचारबंदीचे पालन करावे
अशा सूचना सदर व्हॅनमधून गावकऱ्यांना मिळत आहेत .गावचा आरोग्य विभाग ;ग्रामपंचायत
प्रशासन ;दक्षता समीतीचे वतीने
सूचना गावकऱ्यापर्यत पोहचत आहे .
I