लग्नाच्या परवानगी साठी वर वधू पित्याची धावपड.
धनज बु प्रतिनीधी अंकुश कथे कारंजा हुंकार
धनज बु।। हिंदू संस्कृती प्रमाणे दरवर्षी तूळशी विवाह संपन्न होताच आपल्या कडे वर वधू ची लग्न घाई सुरु होते...परंतु भूतो न भविष्यती हे वर्ष या सर्वांसाठी अपवाद ठरलं...'लग्ना आधीच विघ्न ' या उक्ती प्रमाणे हा वर्षी कोरोना च विघ्न हे या लग्न आधी च आलं आहे...त्यामुळे यात विवाह इच्छुकांची चांगली च फजिती झाली आहे...दिवाळी झाल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यात बरेच लग्न जुळलेत परंतु त्यांनी विवाह च्या तारखा या एप्रिल ते मे या महिन्यात काढल्यात परंतु कोरोना या संसर्गजन्य आजार मुळे सर्व च धार्मिक , सामाजिक, आणि राजकीय कार्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे थाटा माटा विवाहास परवागीस शासनाने नाकारली आहे...परंतु काही लोकांना या कोरोना च्या संकटात सुद्धा विवाह करायचा असल्याचे काही से चित्र ग्रामीण भागात आहे...त्यासाठी लॉक डॉऊन क्र. 2 मध्ये परिशिष्ट एक मधील मुद्दा क्रमांक 4 मध्ये विवाह विषयक निर्णय घेण्याचा सर्व अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यां कडे दिला आहे...तरी आज पोलीस स्टेशन मध्ये बरेच वधू वर पिता हे परवानगी साठी चकरा मारत आहे....हा विवाह साध्या पद्धतीने करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजे चे आहे . परंतु याविषयी ची माहिती त्या वर वधू पित्याने माहित नसल्यामुळे ते अजून हि विवाहा परवानगी साठी धावपड करत आहे...जिल्हाधिकाऱ्यांकडून परवागी मिळविण्यासाठी सुद्धा वधू वर पित्या ला चांगली च कसरत करावी लागत आहे .कारण संचारबंदी लागून असल्यामुळे सर्व वाहाने बंद आहे..त्यामुळे जिल्ह्यच्या ठिकणी जाणे सुद्धा त्रासदायक झाले आहे..पूर्व नियोजित विवाह मध्ये लग्नावश्यक सर्व च कामे वर वधू पित्याने केली होती..यामध्ये लग्नपत्रिका, वाजंत्री , घोडा, कपडे , यासारख्या अनेक गोष्टी वर खर्च केला आहे..त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वधू वर पित्याला आता परवागी साठी हेलपाटे घ्यावे लागत आहे...तरी थाटा -माटा विवाह न करण्यास व जिल्हाधिकारी ठरवून देइल त्या निकषात लग्न करण्यास आज मोठया प्रमाणात वधु वर पिते तयार आहेत...त्यामुळे ते निकष लवकरात लवकर ठरवून द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातील वर वधू पित्या कडून केली जात आहे...
नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आता पर्यंत दोन नवं विवाहित जोडप्यांवर धनज पोलिसांनी कार्यवाही केल्यामुळे ।।आता बरेच वधु वर पिते हे पोलीस स्टेशन मध्ये परवागी येत आहे..परंतु विवाह विषयक नियमना चे सर्व अधिकार जिल्हाधिकारी साहेबांकडे आहेत..
सोमनाथ जाधव
पोलीस निरीक्षक, धनज बु।।