कारंजा तालुक्यातील ग्राम खानापूर येथील सचिव संजीव मनवर हे महिन्यातून एकच दिवस ग्रामपंचायत मीटिंग करिताच येत असतात .परतु आता कोरोना विषाणुचा संसर्ग व जनता कर्फ्यु संचारबंदी लाॅक डाउन व जिल्हा सीमा बंदी या सारखे प्रतिबंदक घातले असताना खानापुर येथे अनेक शहरातुन लोक गावात आले आहे तसेच खानापूर हे गाव अकोला आणी वाशीम या दोन जिल्हाच्या शिमेवर आहे खेर्डा येथे चेक पोस्ट असल्याने सर्व वाहणे हे खानापुर या गावातुन जात असुन याकडे ग्रामसेवकाचे तसेच ग्रामपंचायतीचे कमालीचे दुर्लक्ष दिसुन येत आहे कोरोना या रोगाने थय्यमान घातले असताना ग्रामसेवक हे एकही दिवस गावात आले नाही प्रतेक गावचे ग्रामसेवक आप आपल्या गावात जावुन काही समक्षा आहे काय याबाबत जानुन घेत आहे माञ ग्रामसेवक मनवर यांना खानापुर यागावचा रस्ता दिसेनासा झाला की काय ? अनेक नागरिकांना काही दाखल्यांकरिता त्यांच्याशी संपर्क साधून कारंजा येथे भेटावे लागतात या सर्व प्रकाराकडे माननीय गटविकास अधिकारी यांचे कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे एका ग्रामसेवक काकडे एक किंवा दोन गावे दिली जातात परंतु आठवड्यातून दोन दिवस एका गावात घ्यायला पाहिजे परंतु ग्रामसेवक हे महिन्यातून एकच दिवस म्हणजेच मिटिंगच्या दिवशी गावात येतात इतर दिवस ते कारंज्यात राहतात कोणाच्या काही तक्रारी असल्यास ते स्वतः सांगतात की ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याकडे द्या नंतर मिटिंगच्या दिवशी पाहू परंतु कोणतीही तक्रार दिली तर त्या तक्रारीची दखल हे ग्रामसेवक यांना घ्यावी लागते व त्याबाबत तक्रार आली ती तक्रार मिटिंगच्या नोटीस वरती परंतु अशा प्रकारची नोटीस वर कुठल्याच प्रकारच्या तक्रारीची नोंद ठेवली जात नाही सदर नोटीस वर ग्रामसेवक यांची कुठल्याही प्रकारची स्वाक्षरी दिसून येत नाही सदर कारभार हा सरपंच यांच्या सहीने केला जातो ग्रामसेवक हे गेल्या एक वर्षापासून खानापूर येथील कारभार पाहत आहे परंतु कारभार पाहत असताना गेल्या कित्येक दिवसापासून गावातील समस्या ज्या त्या आहेत गावातील समस्येकडे ग्रामसेवक नद्यांचे कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे या बाबत गावातील नागरिकांनी वारंवार गावातील समस्यांबाबत त्यांना तक्रारी दिल्या परंतु ग्रामसेवक हे गावात येतच नसल्यामुळे गावातील नागरिकांनी समस्या सांगाव्यात तर कोणाकडे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे या सर्व प्रकाराकडे माननीय गटविकास अधिकारी हे या प्रकरणात लक्ष घालून या गावातील समस्या निकाली काढून पहातील काय व या गावातील कामचुकार ग्रामसेवक यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी देखील या निमित्ताने गावातील नागरिकांकडून होत आहे असे झाल्यास गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही नाहीतर अशा ग्रामसेवक यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे संबंधित ग्रामसेवकास तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे