सागर ढेरे कडून कारंजा तहसीला 10 किंटल गव्हाची मदत
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
कारंजा तालुक्यातील ग्राम हिवरा लाहे येथील सरंपच सागर ढेरे हे गरिबाच्या मदतीला आले धावून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉक डाउन केल्यामुळे तालुक्यातील बेघराना अन्न धान्याची मदत मिळावी या करिता कारंजा तालुक्यातील ग्राम हिवरा लाहे येथील युवा सरपंच सागर अशोक ढेरे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार धीरज मांजरे यांना 10 किटल गव्हाची मदत दि.18 एप्रिल रोजी देण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार हरणे साहेब उपस्थित होते.