आपतत्कालीन परिस्थितीमध्ये खानापुरचे चे ग्रामसेवक सतत गैरहजर.
गटविकास अधिकारी यांचा ग्रामसेवकाला आशीर्वाद तर नाही ना ?
कारंजा ( कारंजा हुंकार )कारंजा तालुक्यातील ग्राम खानापुर येथील ग्रामपंचापतचे कार्यालयाचे ग्रामसेवक आपत्कालीन काळात सतत गैरहजर राहत असताना संबंधित विभागा कडुन काहीच कारवाई केल्या जात नसल्याने गावकरी मंडळी आश्चर्य होत आहे .या कामचुकार दांडीबाज ग्रामसेवकाची अधिका-याची खातेनिहाय चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी मा. उपसरपंच अंकुश कडु यांनी वरिष्ठा कडे केली आहे .
जिल्हा आणि तालुका प्रशासनाने कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव कुठल्याही परिस्थितीमध्ये वाशीम जिल्ह्यामध्ये होऊ नये या अनुषंगाने आपात्कालीन परिस्थितीची घोषणा केलेली असून, कोरोना या संसर्गजन्य आजाराचा अटकाव होण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर प्रशासना द्वारा राबविल्या जात आहेत.
माननीय पंतप्रधानांनी 22 मार्च रोजी जनसंचार बंदी आणि लगेच संपूर्ण देशामध्ये साथरोग नियंत्रण कायदा लागू करून संचारबंदीही लागू केलेली असल्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये बाहेरगावी आणि महानगरांमध्ये रोजगारा निमित्त असलेले मूळ नागरिकांचे लोंढे लोंढे येत असल्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार होण्याची भीती होती. बाहेर गावावरून येणार्या नागरिकांची गावाच्या बाहेरच तपासणी करण्याचे काम आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी, , कृषी विभागातील कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, पोलिस प्रशासन या व इतर अनेक विभागातील कर्मचार्यांची नियुक्ती या आपत्कालीन स्थितीमध्ये करण्यात आलेली असताना यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मचार्यांनी अशा महत्त्वाच्या कामासाठी कर्तव्यावर असणे गरजेचे असताना खानापुर ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक आपले कर्तव्याला विसरले असल्याची गंभीर तक्रार मुख्यकार्यपालन अधिकारी वाशिम यांचे करण्यात आली आहे .
विशेष महत्त्वाचे म्हणजे कारंजा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांचे कडे खानापुर चे ग्रामसेवक यांच्या सतत च्या गैरहजरी बाबत अनेकदा तक्रारी वत पञात वांरवार बातम्या प्रसारीत करण्यात आल्या मात्र काहीच कारवाई झाली . त्यामुळे कारंजा पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी यांचे ग्रामसेवकाला पाठिशी घालण्याचे काम करीत असल्याचे दिसुन येत आहे
आपतत्कालीन परिस्थितीमध्ये खानापुरचे चे ग्रामसेवक सतत गैरहजर. गटविकास अधिकारी यांचा ग्रामसेवकाला आशीर्वाद तर नाही ना ?