वाशीम जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी खांदला येथे चेक पोष्ट सुरु
पहिल्याच दिवशी दोन शिक्षक गैहजर. कार्यवाहीकडे लक्ष
कारंजा लाड — दि २८ ( कारंजा हुंकार )
वाशीम जिल्हात छुप्या मार्गाने लोक वाशीम जिल्हात दाखल होत असल्याने वाशीम अकोला जिल्हाच्या ठिकांनी असलेल्या गावाच्या सिमेवर चेक पोष्ट सुरु करण्यात आले आहे त्यामुळे ईतर जिल्हातुन नागरिकांना जिल्हात प्रवेश करता येनार नाही .अशा चेक पोष्टवर दोन शिक्षकांची डिवटी लावण्यात आली होती पण त्या दोन्ही शिक्षकांनी पहिल्याच दिवशी दांडी मारली .वाशीम जिल्हा कोरोना मुक्त झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पाउल उचले असुन पुन्हा बाहेर जिल्हातुन एकही नागरिक वाशीम जिल्हात येता कामा नये जिल्हात कोरोनाचा एकही रुग्न येता कामा नये याकरीता कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे एस डि पी ओ पाटिल साहेब ठाणेदार डी बी इगळे यांनी कारंजा तालुक्यात कडक बदोबंस्त तय्यनात करण्यात आला. जिल्हाच्या सिमेवर असलेल्या सर्व गावात एकुण २४ चेक पोष्ट लावण्यात आले आहे त्यापैकी एक खेर्डा येथुन जवळच म्हणजे खांदला या रोडवर एक चेक पोष्ट सुरु करण्यात आले त्यावेळी कारंजाचे एस डी पी ओ साहेब यांनी चेक पोष्ट ला भेट दिली .सर्व चेक पोष्ट वर एक पोलिस कर्मचारी आणी दोन शिक्षक व गावाती पोलीस मिञ अशी निवड करण्यात आली असता पोलीस कर्मचारी वेळेवर हजर झाले परंतु ज्या दोन शिक्षकांची निवड केली ते दोन शिक्षक सकाळी ८ ते ४ वाजेपर्यत त्यांची डिवट्टी होती तरी ते हजर झाले नाही याबाबत गट शिक्षण अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता डिगांबर तु. माकोडे ,शिवदत्ता ना. शिंदे हे दोन शिक्षक चेक पोष्टवर आले नसल्याने पवार पटवारी यांनी तहसिदार साहेबाना फोन लावुन हे दोन शिक्षक सकाळी ८ वाजतापासुन आले नसल्याचे सांगीतले याबात गटशिक्षण अधिकारी यांनी सांगीतले की हे दोन शिक्षकाने मुख्यालय सोडण्याची कोनतीही परवागी घेतली नाही ते दोन शिक्षक माकोडे हे दर्यापुर ला आहे तर दुसरे हे रिसोड ला आहे त्यामुळे ८ ते ४ वाजेपर्यत कोणीच शिक्षक आले नव्हते त्यामुळे दांडी मारुन गेलेल्या शिक्षकांनवरती गटशिक्षण अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे यावेळेस मंडळ अधिकारी लोखंडे साहेब पोलिस कर्मचारी हरिओम जाधव पटवारी पवार साहेब खानापुरचे पटवारी शैलेश घोगरे ग्रामसेवक राजेश हवा ग्राम पंचायतचे कर्मचारी संकेत सरपंचाचे पती आनंद ढोके यादीची उपस्थिती होती