- एस डी पी ओ संजय पाटील यांची धनज बु।।येथे भेट.
धनज बु।।. प्रतिनीधी अंकुश कथे ( कारंजा हुंकार )
कोरोना व्हायरस मुळे लागून करण्यात आलेल्या संचार बंदी मुळे फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे....या लॉक डॉऊन मध्ये शहरी तसेच ग्रामीन भागातील सर्व बँका सुरु आहेत..परंतु बँकांमध्ये होत असलेल्या गर्दी मूळे सोशल डिस्टन्स पूर्ण पणे फज्जा उडाला आहे..त्याच पार्श्वभूमीवर एस डी पी ओ संजय पाटील यांनी धनज येथिल दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा ,धनज यांना भेट दिली..व होत असलेली नागरिकांची गर्दी कशाप्रकारे टाळता येइल याविषयी बँकेच्या कर्मचाऱ्याशी चर्चा केली...तेव्हा पाटील यांनी बँके समोर डब्बे आखण्याच्या व टोकन पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या दिल्या...त्यामुळे नागरिकांकडून होणारी गर्दी टाळता येइल ..या वेळी धनज बु ।।चे ठाणेदार सोमनाथ जाधव हे पण यावेळी उपस्तिथ होते....