जानोरी येथे कारंजा ग्रामीण पोलिसांचे चेकपोष्ट सुरु
काजळेश्वर उपाध्ये नकुल उपाध्ये (कारंजा हुंकार )
काजळेश्वर उपाध्ये : अकोला जिल्हयातून पिंजरघोटा मार्गे कारंजा तालुक्यातील काजळेश्वर कडे आवागमन करणाऱ्याची घुसखोरी लक्षात घेता कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांनी सूचविल्याप्रमाणे कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिगंबर इंगळे यांनी प्राथमिक शिक्षकांचे सहाय्य घेत जानोरीलगत
चेक पॉइन्ट दि .२८ एप्रीलपासून सुरू केला आहे .
प्राप्त माहीतीनुसार वाशिम जिल्हा कोरोणा मुक्त रहावा करीता प्रशासन जिवाच रान करीत आहे . घरातच थांबा ;बाहेर फिरू नका हे वारंवार सांगत आहे तरीही लगत असलेल्या अकोला जिल्ह्यातून घुसखोरी होत होती ती रोकण्यासाठी
कारंजा तहसीलदार धीरज मांजरे
यांनी कारंजा ग्रामीण पोलिसांचे मदतीने शिक्षकांचा आधार घेत जानोरी गावाजवळ अकोला जिल्हा
सिमा बंद केली . या जनतेच्या उत्तम
स्वास्थाच्या कामासाठी ;ग्रामस्थांना
कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी जानोरी
ग्रामपंचायत ;पोलीस पाटील ;ग्रामसचिव ;तलाठी ;मदत करीत आहेत .आम्हीच आमचे रक्षक व्हा प्रशासनास सहाय्य करा घरातच रहा :सुरक्षीत रहा : वारंवार हात घुवा ;तोंडाला मास्क बांधा ;फिजीकल डिस्टन्स ठेऊन कोरोणा हरऊ या असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे .
या चौक्यांना वरिष्ठांनी भेटी देत जाव्या असे ग्रामपंचायत प्रशासन सुचवित आहे .