काजळेश्वर उपाध्ये येथे ग्रामपंचायत
कडून प्रत्येक कांटूबाला सॅनीटायझर
कीटचे वाटप .
ग्रामविकास अधिकारी आर.आर. मुळे यांचा ग्रामपंचायत प्रशासनातर्फे पुढाकार .
कीटवाटप प्रसंगी आजी ' माजी जीप . सदस्य ' पंस . सदस्य ;ग्रा.पंसदस्यांची उपस्थिती
सोशल डिस्टन्सींगचे पालन .
काजळेश्वर नकुल उपाध्ये ( कारंजा हुंकार )
काजळेश्वर उपाध्ये : गावात कोरोणा विषाणूचा संसर्ग होऊ नये करीता चौदाव्या वित्त आयोगात केलेल्या
नियोजनानुसार शासनाचा जीप. स्तरावरुन आलेला निधीतून ग्रामविकास अधिकारी आर . आर . मुळे यांच्या पुढाकारात ग्रामपंचायत मंडळाचे मार्गदर्शनात गावातील ८५० कुटुंबाना सॅनीटायझर कीटचे वाटप
आजी ' माजी : जी.प. सदस्य ;पं.स. सदस्य ;ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाचे उपस्थितीत सोशल डिस्टन्सींगचे पालन करून घरोघरी
जाऊन ' दि .२५ एप्रीलपासून सुरु केले .
प्राप्त माहीतीनुसार कोरोणा विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता काजळेश्वर उपाध्ये येथील ग्रामस्थ सुरक्षीत रहावे ;कोरोना विषाणूचा बाधा गावकऱ्यांना होऊ नये करीता गावातील प्रत्येक कुंटूबाला स्वतंत्र
सॅनी टायझर कीट त्यात मास्क ;हॅन्ड वॉश ' ;हॅन्डग्लोब;सॅनी टायझर असलेली संपूर्ण कीटअशी गावात ८५० कुंटूब राहतात त्यांना वाटपाचे काम ग्रामविकास अधिकारी आर .आर. मुळे यांचे पुढाकारात ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाचे मार्गदर्शनात सुरू झाले आहे . कीटचे वाटप आदीवासी वस्तीपासून सुरू केले आहे . याप्रसंगी माजी जी.प. सदस्या सौ . ज्योती ताई गणेशपूरे ;काजळेश्वर सर्कलचे जीप सदस्यअशोकराव डोंगरदीवे ; पं.स. सदस्य
रंगराव धुर्वे ;सरपंच चंपा कोडापे ;ग्रा.प. सदस्य राजकुमार उपाध्ये ;नितीन पा . उपाध्ये तथा इतरही ग्रा प. सदस्य गण ;पोलीस पाटील : दक्षता समिती आरोग्य समीती ;समाजसेवक मंडळी ;ग्रा.प. कर्मचारी वर्ग यांची आरोग्य कीट वाटप प्रसंगी उपस्थीती होती .
ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी ग्रामपंचायत प्रशासन घेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने जीप. सदस्य अशोकराव डोंगरदीवे : पं.स. सदस्य रंगराव धुर्वे : माजी जीप. सदस्या सौ . ज्योती ताई गणेशपूरे यांनी समाधान व्यक्त केले .
काजळेश्वर उपाध्ये येथे ग्रामपंचायत कडून प्रत्येक कांटूबाला सॅनीटायझर कीटचे वाटप . ग्रामविकास अधिकारी आर.आर. मुळे यांचा ग्रामपंचायत प्रशासनातर्फे पुढाकार . कीटवाटप प्रसंगी आजी ' माजी जीप . सदस्य ' पंस . सदस्य ;ग्रा.पंसदस्यांची उपस्थिती सोशल डिस्टन्सींगचे पालन .
• ankush kadu