धनज बु ते कारंजा रोड वर कारंजा ग्रामीण पोलिसांनी मुरूम टाकून रस्ता केला बंद
धनज बु प्रतिनीधी अंकुश कथे ( कारंजा हुंकार )
धनज बु।। कोरोना व्हायरस च्या वाढत्या संसर्ग ला आळा घालता यावा या दृष्टीने जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी जिल्हाबंदी चे आदेश दिलेत..मात्र कारंजा ग्रामीण पोलिसांनी धनज बु।। ते कारंजा हा रस्ता नारेगाव जवळ मुरूम टाकून बंद केला आहे..ज्या ठिकाणी हा रस्ता बंद करण्यात आला आहे....मात्र येथे कोणत्या च जिल्ह्याची सीमा नसून धनज पो स्टे ची हद्द समाप्त होते..तरी अशा प्रकारे मुरूम चा ढिग टाकून रस्ता बंद केल्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनधारकांची मोठी फजिती झाली आहे..त्यांना तिथून कोणता हि मार्ग नसल्यामुळे परत जावे लागत आहे...कारंजा हे तहसील चे ठिकाण आहे..तसेच गावातील लोकांना दवाखाना तसेच बँकेत जाण्यासाठी हा च मार्ग असल्यामुळे कारंजा ला कसे जावे हा प्रश्न त्यांचा समोर उपस्तिथ झाला आहे..तसेच शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपला माल घेऊन जाण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहे..तरी कारंजा ग्रामीण पोलिसांनी याची दखल घेऊन हा रस्ता पूर्वरत करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे