कोरोनाच्या लढ्यासाठी मो.मौलवी मज़हर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११ हजाराची मदत
प्रतिनिधी । कारंजा (लाड) कारंजा हुंकार
कोरोनाच्या लढ्यासाठी जमियत उलेमा-ए-हिंद तसेच तब्लीगी जमात चे मो.मौलवी मज़हर मझाहिरी यांनी ११ हजार रूपयाची मदत केली आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या खात्या करिता उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे,तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्फत धनादेश दिले आहे.
संपूर्ण जगभरात कोरण्याचा प्रादुर्भाव झाला असून मोठे संकट ओढवले आहे. देशाचे पंतप्रधान यांनी देशभरात लॉकडाऊन पुकारला आहे. या संकटावर मात करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मो.मौलवी मज़हर मझाहिरी यांनी मदत केली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकार घेत असलेल्या आर्थिक तरतुदीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कोव्हिड-१९ या खात्यामध्ये रक्कम त्यांनी धनादेश द्वारे दिली आहे. मौलवी म्हणाले, ”देशावरील हे संकट मोठे आहे. प्रत्येकाने आपापल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोणीही घराबाहेर पडू नये. सर्वांनी घरी राहून सरकारला सहकार्य करावे. सरकारच्या सूचनांचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वारंवार साबनाने हात धुवावेत”.