बाहेर पडतांना मास्क वापरा .ग्रा प. सदस्य नितीन पाटिल
काजळेश्वरात गरजूंना कोरोणा विषाणू पासून वाचण्यासाठी मास्क देत आहे मोफत टेलर जाधव व नितीन पाटील .
काजळेश्वर उपाध्ये प्रतिनीधी नकुल उपाध्ये (कारंजा हुंकार ) :कोरोणा विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोरोणा संसर्ग काजळेश्वरवासीयांना होऊ नये करीता येथील युवा ग्रा.प. सदस्य नितीन उपाध्ये यांनी टेलर महादेव जाधव यांना कापड उपलब्ध
करून दिले आणि दोघांच्या सहयोगातून गावकऱ्यांना मोफत मास्क देण्याचे काम सुरू झाले आहे .
प्राप्त माहीतीनुसार कोरोणा विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन प्रशासनाने सुचविलेले पर्याय
गावकऱ्यांनी स्वीकारावे . घरातच थांबा सोशल डिस्टंसींग पाळा आणि
बाहेर पडायचेच असेल तर तोंडावर चेहऱ्यावर मास्क वापरा . त्यासाठी ज्यांना आवश्यक असेल त्यांनी गावातील महादेव जाधव टेलरला फोनवर मास्कची मागणी करा त्यांना मोफत मास्क ग्रा.पं.सदस्य नितीन पाटील यांचे सहयो गातून दिल्या जात आहे . नितीन पाटील उपाध्ये यांनी मास्कसाठी पांढरे सुती कापड
टेलरकडे दिले असून बिना मोबदला
टेलर महादेव जाधव मास्क गरजू गावकऱ्यांना पुरवित आहे . घरातून अपरीहार्य स्थीतीत घराबाहेर पडायचे असेल तर खबरदारी करीता मास्क वापरा आणि कोरोणा संसर्ग
टाळण्यासाठी गावकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे नितीन पाटील यांनी सुचवले आहे .