उबडाॅबाजार परिसरात भुईमूंगाचे पीक बहरले
उंबडाॅबाजार प्रतिनीधी ( कारंजा हुंकार )
उंबडाॅबाजार सह परिसरात अनेक शेतक-यांना खरीप पिकाच्या हंगामात निसर्गाच्या अवकृपेने मोठा फटका बसला .शेतीसाठी लागलेला पैसा सुध्दा वसुल झाला नाही .पर्यायी पिक म्हणून रब्बी हंगामात भुईमूगाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे .सध्यस्थितीत पोषक वातावरणामुळे शेत शिवारात भुईमूगाचे डौलात बहरले आहे .
सविस्तर असे की यावर्षीच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने सर्वत्र ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती .यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन , उडीद , तुर , मुंग आदी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली .खरिपाच्या पिकांसाठी लागवडी पासुन माल घरी येईपर्यंत झालेला खर्च सुध्दा वसुल झाला नव्हता. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता .
यामुळे शेतकरी वर्गांच्या आशा भरघोस उत्पन्नासाठी रब्बी हंगामातील गहू , हरभरा या पिकावर केंद्रीत झाल्या होत्या .मात्र गहू हरभरा पिक काढणीला आले असतांना अवकाळी व गारपीटीने कहर केल्याने अनेक अनेक शेतक-यांचा गहू हरभरा पीक शेतातच नष्ट झाले .
यावर पर्यायी व्यवस्था म्हणून अनेक शेतक-यांनी शेतात लागलेल्या खर्चाची बरोबरी व्हावी या दृष्टीने उसनवारी करून शेतात भुईमूगाची पेरणी केली व सध्या अनेक शेतक-यांच्या शेतात पेरणी केलेले भुईमूगाचे पिक बहरले असुन निसर्गाने साथ दिली तर मोठ्या उत्पादनाची आस शेतकरी वर्गाला लागली आहे .
उबडाॅबाजार परिसरात भुईमूंगाचे पीक बहरले
• ankush kadu