वाशिम जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने मुख्यमंत्री साह्याता निधीत ११ लाखाचे योगदान द्या
शिक्षक सेनेची मागणी..
प्रतिनीधी अशोक राऊत कारंजा हूंकार
मंगरुळपीर .दि.१७ कोरोना-कोविड १९च्या विषाणूंमुळे महाराष्ट्रात महासंकट असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीत रु.११,००,०००अकरा लाख रूपये योगदान देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन वाशिम जिल्हा म.रा.शिक्षक सेनेच्या वतीने देण्यात आले.
महाराष्ट्रात कोविड-१९च्या विषाणूंमुळे महासंकट आले आहे. या संकटात आपल्या महाराष्ट्र सरकारचीआर्थिक स्थिती पाहता सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे.
दरवर्षी आपल्या पतसंस्थे मार्फत विविध कार्यक्रम जसे प्रगटदिन,जयंत्या व विविध जाहिराती वर लाखो रुपये खर्च करतो, तसेच स्टेशनरि खर्च व इतर खर्च कमी करुन या संकटात राज्याला, मानवकल्यानाला आपला हातभार लागावा या उद्देशाने व मा.मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आव्हानाप्रमाने आपल्या पतसंस्थेकडुन मुख्यमंत्री सहायता निधी अकरा लाख रु.(११,००,०००)देण्यात यावे असे निवेदन शिक्षक सेना वाशिम जिल्हा च्यावतिने केले आहे.निवेदनावर पांडुरंग रा.कोठाडे जिल्हा अध्यक्ष,पांडुरंग जायभाये,देवेंद्र धोटे,भगवान लोंढे, लाडके,अनिल राऊत,नारायण डुबे,सुरज राऊत,संजय गोंडकर आदी शिक्षकांच्या सह्या आहे.