इंसाफ स्मॉल फायनन्स कडून अल्पोपहार व शतपेयाचे वाटप
कारंजा लाड दि. 20 कारंजा हुंकार
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्यावर असणारे पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्याचे मनोबल वाढविण्यासाठी इंसाफ स्मॉल फायनन्स बँक शाखा कारंजा यांच्या वतीने पोलिसांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना नास्ता व शीतपेय वाटप करण्यात आले.
तसेच कोरोना बरोबर वाढती ऊन लक्षात घेता इंसाफ स्माल फायनन्स बँक कडून अल्पोपहार व शीतपेयाचे वाटप शहरातील आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे मनीष पाटिल, मनोज गावंडे, अमरदीप ठाकरे उपस्थित होते.
कारंजा हुंकार